शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आमदार सुरेश भोळे यांच्या हॉटेलमध्ये रात्री तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:11 IST

दोन जणांना अटक

ठळक मुद्दे दारुच्या बाटल्या व कपाट फोडले

जळगाव : भाजपा आमदार सुरेश भोळे यांच्या मालकीच्या शाहू नगरातील हॉटेल वूडलँडमध्ये बील देण्याच्या कारणावरुन वाद होऊन दारुच्या बाटल्या व शोकेसचे काच फोडल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करुन कलम १५१ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.नीलेश संतोष साळुंखे (२३) व विनोद उर्फ विक्की किशोर रणसिंग (२६ दोन्ही रा.शाहू नगर, जळगाव) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आमदार भोळे यांच्या मालकीची शाहू नगरात वूडलँड नावाची हॉटेल व परमीट रुम बियरबार आहे. नीलेश साळुंखे व विक्की रणसिंग हे दोन्ही सोमवारी रात्री या हॉटेलमध्ये गेले होते. तेथे ९ वाजता बील देण्याच्या कारणावरुन व्यवस्थापक विठ्ठल सुपडू कोळी (३०, रा.अयोध्या नगर, जळगाव) व वेटर जयप्रकाश यांच्याशी दोघांचा वाद झाला. हा वाद इतका वाढला की नीलेश व विक्की यांनी दारुच्या बाटल्या फोडून दारु बाटल्यांचे शोकेशही फोडले. त्यामुळे हॉटेल व बाहेर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.पोलीस पोहचल्याने टळली मोठी घटनाशाहू नगर परिसरात वाद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी तातडीने गस्तीवरील कर्मचारी शाहू नगरात रवाना केले. हॉटेलच्या बाहेर प्रचंड गर्दी होती व हॉटेलमध्ये वाद सुरु होता.पोलिसांनी नीलेश व विक्की या दोघांना ताब्यात घेतले. व्यवस्थापक विठ्ठल कोळी याच्या फिर्यादीवरुन दोघांविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दोघांवर कलम १५१ प्रमाणे कारवाई करुन अटक केली.पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यामुळे या भागातील संभाव्य मोठी घटना टळली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी