शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

उद्यापासून एस.टी. धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:16 IST

जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून थांबलेल्या एस. टी बसेस्ची चाके २२ मे पासून पुन्हा धावणार आहेत. शासनाने बस सेवा ...

जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून थांबलेल्या एस. टी बसेस्ची चाके २२ मे पासून पुन्हा धावणार आहेत. शासनाने बस सेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिली असून, जिल्हाभरातील अकरा आगारांमधून सकाळी सात वाजता बसेस् सुटणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आल्याने गेल्या २३ मार्च पासून महामंडळाची सेवा बंद आहे. सेवा बंद असल्यामुळे महामंडळाचे दैनंदिन उत्पन्न थांबले असून, परिणामी यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारदेखील रखडले. गेल्याच आठवड्यात परप्रांतीय बांधवांना सीमेवर सोडण्यासाठी एस.टी महामंडळाची सेवा सुरू झाली आहे. मात्र, सर्व सामान्य प्रवासी आणि चाकर मान्यासांठी सेवा कधी सुरू होणार, याबाबत सर्वांची प्रतीक्षा होती. अखेर शासनाने बुधवारी बस सेवा सुरु करण्याचे महामंडळाला आदेश दिले असून, तसे आदेश जळगाव विभागाला बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेत.सायंकाळी सात वाजेपर्यंत धावणार बसेस्जिल्ह्यामधील विविध आगारांमधून सकाळी सात वाजता पहिली बस सुटणार आहे. सायंकाळी सात पर्यंत या बसेस धावणार आहेत. जळगाव, अमळनेर, पाचोरा व भडगाव येथे रुग्ण संख्या जास्त असल्यामुळे येथील फेºया बंद राहणार आहेत. स्थानकातून बस निघण्यापूर्वी प्रत्येक बस सॅनिटाईज केली जाणार आहे. बस सेवा सुरू होणार असल्याने विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हाभरातील सर्व आगार व्यवस्थापकांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. सेवा सुरु करण्यासाठी बसेसची देखभाल करुन, बसेस सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या.शासनाच्या सुचनेनुसार २२ मेपासून बस सेवा सुरू होणार आहे. ही सेवा जिल्हा अंतर्गंतच असून, सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत बसेस सुरु राहतील. बसमध्ये सोशल डिस्टनिंगचे पालन करण्यात येणार असून एका बसमध्ये फक्त २२ प्रवाशानांच प्रवेश दिला जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील सेवे संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन, निर्णय घेण्यात येईल.-राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, जळगाव 

टॅग्स :Bus DriverबसचालकJalgaonजळगाव