शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

चोपडा रस्त्यावर टोमॅटोचा लाल चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 17:24 IST

भाव नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकले महामार्गावर

ठळक मुद्दे२० किलो कॅरेट टोमॅटोची २० ते ६० रुपयात विक्रीमध्यम प्रतीच्या टोमॅटोला खरेदी करण्यासाठी व्यापा-यांचा नकारहताश झालेल्या शेतक-याने टोमॅटो फेकले रस्त्यावर

आॅनलाईन लोकमतचोपडा,दि.५ : प्रत्येक भाजीची चव वाढविणा-या टोमॅटोचे भाव पडल्याने तो बेचव झालेला आहे. ४० ते ५० रुपये कॅरेट अशी विक्री होत असलेल्या टोमॅटाला भाव नसल्याने उद्विग्न झालेल्या एका शेतक-याने गुरुवारी सकाळी महामार्गावर टोमॅटो फेकल्याने लाल चिखल निर्माण झाला आहे.सध्या कमी होत असलेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत घट होत आहे. काही शेतक-यांच्या कुपनलिका तर बंद पडल्या आहेत. त्यामुळे शेतक-यांवर उभ्या पिकावर नांगर फिरविला जात आहे. अशा परिस्थित शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले. मात्र बाजारात गोबी, गड्डा गोबी, टोमॅटो, तसेच अन्य भाजीपाला पिकांना भाव नसल्याने शेतक-यांना भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. सध्या चोपडा तालुक्यातील आडगाव, लासूर, चोपडा, वडती, शिरागड, शिरपूर तालुक्यातील तरडी येथून टोमॅटोची आवक सुरु आहे. गुरुवारी धानोरा येथील बाजारात चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला २० किलो कॅरेटसाठी ४० ते ६० रुपये असा भाव होता. तर बाजारात किरकोळ विक्रेत्यांकडून १० रुपयाला दीड किलो टोमॅटोची विक्री केली जात आहे. त्यातच मध्यम प्रतीच्या टोमॅटोला व्यापारी घेत नसल्याने शेतक-यांच्या वाहतुकीचा खर्च देखील निघत नाही आहे.गुरुवार ५ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अंकलेश्वर बु-हाणपूर महामार्गावरील चोपडा-अडावद दरम्यान असलेल्या कृषितंत्र महाविद्यालयासमोर पुलावर एका शेतक-याने सुमारे तीन ते चार क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहेत. शेतातून माल काढून आणल्यावर बाजारात भाव मिळत नसल्याने अतिशय उद्विग्न अवस्थेत शेतक-याने हा माल रस्त्यावर फेकला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडा