शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात शेतकरी संपामुळे टमाटे, हिरवी मिरची कडाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 19:11 IST

भाजीपाला लिलाव सुरळीत

ठळक मुद्देकर्नाटकातील आंब्याची आवक थांबलीधान्य बाजारातही परिणाम

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३ - आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या दुसºया दिवशीही जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांचा लिलाव सुरळीत झाला. मात्र कर्नाटकातून मराठवाडामार्गे आंबे घेवून येणारी वाहने न आल्याने आंब्याची आवक घटली आहे. सोबतच टमाटे व हिरवी मिरचीची आवक कमी झाल्याने टमाट्याचे भाव दुप्पट तर मिरचीचे भाव दीडपटीने वाढले आहे.शेतमालास हमी भाव व संपूर्ण कर्जमुक्ती व शेतकरी विरोधी कायद्यांमध्ये बदल करावा या याप्रमुख मागण्यांसाठी शेतकºयांच्या देशव्यापी संपास १ जून पासून सुरूवात झाली. संपाचा आज दुसरा दिवस होता.कर्नाटकातील आंबा थांबलाजळगावात संपाचा फारसा परिणाम नसला तरी कर्नाटकातून आंबे घेऊन येणारी वाहने जळगावात येऊ शकली नाही. ही वाहने मराठवाडामार्गे येतात. परिणामी दक्षिण भारतातील आंबा येथे येणे थांबला आहे. मात्र गुजरातमधून आंब्याची आवक सुरू असल्याने आंब्याच्या भावावर फारसा परिणाम झालेला नाही.टमाटे, हिरवी मिरचीची आवक घटलीमराठवाड्यातील काही भागासह पाटणादेवी येथून येणाºया टमाट्याची आवक घटली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोनच दिवसात टमाट्याचे भाव जवळपास दुप्पट झाले आहे. बाजार समितीमध्ये ४०० ते ५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या टमाट्याचे भाव एक हजार ते दीड हजार रुपयांवर पोहचले आहे. किरकोळ बाजारातही हे भाव ३० ते ४० रुपये प्रती किलोवर पोहचले आहे.हिरवी मिरचीदेखील उत्तर भारतातून येत असल्याने दोन दिवसांपूर्वी निघालेला माल येथे येऊ शकला, मात्र पुढे काही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हिरव्या मिरचीचेही भाव १५०० रुपये प्रती क्विंटलवरून २००० ते २५०० रुपयांवर पोहचले आहे. किरकोळ बाजारातही हे भाव ४० ते ४५ रुपये प्रती किलोवर पोहचले आहे. आधीच उन्हाळ््यामुळे भाजीपाल्याची आवक कमी असल्याने त्यांचे भाव वाढलेले आहे. त्यात आता आणखी भर पडत आहे.धान्याचीही आवक थांबलीसंपामुळे धान्य विक्रेतेही बाजार समितीत धान्य आणत नसल्याचे सांगण्यात आले. पहिल्या दिवशी ५० टक्केच आवक होऊ शकली व दुसºया दिवशी शनिवारी तर आवक नसल्या सारखीच होती, असे व्यापाºयांनी सांगितले.शेतकरी संप काळात ‘अ‍ॅलर्ट’ राहण्याबाबत सूचना असून त्यानुसार मिळालेल्या सूचनांचे पालन केले जात आहे. सर्व बाजार समितींनाही सूचना देण्यात आल्या असून २४ तास लक्ष ठेवून आहे.- विशाल जाधवर, जिल्हा उपनिबंधकशेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी धान्याची ५० टक्केच आवक होऊ शकली व २ रोजी तर आवक नसल्यासारखीच होती.- शशी बियाणी, धान्य व्यापारी.संपाच्या दुसºया दिवशी भाजीपाल्याचा लिलाव सुरळीत झाला. मात्र कर्नाटकातून येणाºया आंब्याची वाहने येऊ शकली नाही. सध्या टमाटे व हिरवी मिरचीची आवक घटल्याने त्यांचे भाव वाढले आहेत.- वासुदेव पाटील, सुपरवायझर, कृउबा, जळगाव. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपJalgaonजळगाव