शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या टपावर ठेवलेले टायर डोक्यावर आदळून दुचाकीस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 11:52 IST

एक जण गंभीर जखमी; दोन्ही सख्खे चुलत भाऊ

ठळक मुद्देसंतप्त नागरिकांनी केला रास्ता रोको

जळगाव : बसच्या टपावर ठेवलेले टायर रस्त्यावर कोसळून दुचाकीस्वारांच्या अंगावर ते आदळले. यात घनश्याम उमाकांत पाटील (३७) हे जागीच ठार झाले तर मागे बसलेले तापीराम माधवराव पाटील (३६ दोन्ही रा.सावखेडा बु. ता. जळगाव) हे गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता करंज व सावखेडा गावादरम्यान घडली. घनश्याम व तापीराम दोन्ही सख्खे चुलत भाऊ आहेत. यानंतर संतप्त नागरिकांनी कारवाईच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले.याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावखेडा बु. येथील घनश्याम पाटील व तापीराम पाटील हे दोन्ही सख्खे चुलत भाऊ मंगळवारी कामानिमित्त दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी. पी.०८४६) जळगाव शहरातील काम आटोपल्यानंतर घरी परत जात असताना दुपारी चार वाजता करंज व सावखेडा गावाच्या दरम्यान भोकरकडून जळगावकडे येणाऱ्या एस.टी.बसच्या (क्र.एम.एच.२० बी.सी.२४१४) टपावर ठेवलेले टायर (स्टेपनी) अरुंद रस्त्यामुळे कोसळले. ते जमिनीवर आदळल्यानंतर थेट दुचाकीस्वारांच्या अंगावर गेले. त्यात दोन्ही जण जमिनीवर कोसळले. टायरचा मार लागल्याने घनश्याम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा होऊन डोळाच बाहेर आला तर तापीराम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तापीराम यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.संतप्त नागरिकांनी केला रास्ता रोकोया घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बसचे चालक सिताराम कोळी व वाहक म्हणून विशाल थोरात होते. दरम्यान, यावेळी काही जणांनी फोटोसेशन करण्यातच धन्यता मानल्याचे दुर्देवी चित्र बघायला मिळाले. घनश्याम यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केलाअरुंद व निमुळत्या रस्त्यामुळे घडली दुर्घटनाया घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुरेश पाटील (रा.सावखेडा) यांनी सांगितले की, घनश्याम व तापीराम हे दोन्ही भाऊ दुचाकीवरुन जात असताना त्याच वेळी भोकरकडून जळगावकडे एस.टी.बस जात होती. अरुंद व निमुळता रस्ता असल्याने बसच्या टपावर ठेवलेले टायर जमिनीवर कोसळले व ते आदळून दुचाकीस्वारांच्या अंगावर आले. या घटनेनंतर स्वत: सुरेश पाटील, कैलास पाटील, रघुनाथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला जिल्हा रुग्णालयात हलविले.

टॅग्स :Accidentअपघात