शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थ गरोदर महिलेस चालक-वाहकाची वेळेवर मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 15:32 IST

अनेक किलोमीटर अंतर पायी कापणाऱ्या गरोदर मातेस वेळीच मदत मिळाल्याने तिचे प्राण वाचले. यासाठी बसचालक आणि वाहकाने तिला उपचारार्थ रुग्णालयातही दाखल केले.

ठळक मुद्देकर्की फाट्यावरील घटनामहिलेने मानले चालक-वाहकांचे मनापासून आभार

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : खंडवा (मध्य प्रदेश) येथून अकोला येथे जाणारी गरोदर मजूर महिला मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावरून पायी येत असताना अस्वस्थ स्थितीत कर्की फाट्यावर भर रस्त्यावर होती. अंतुर्लीकडून येणाºया बसचालकास हे दिसले. महिला संकटात असल्याचे लक्षात येताच चालकाने वाहकाला चौकशी करण्यासाठी पाठवले. महिला गरोदरपणात अस्वस्थ झाली पाहून तिला बसमध्ये बसवून थेट उपजिल्हा रुग्णालयात आणून दाखल केले. संकट समयी चालक वाचकाची मदत मिळाल्याने अस्वस्थ महिलेची तब्येत स्थिर झाली आणि तिच्या चेहºयावर हास्य फुलले.अकोला जाणाºया या गरीब गरोदर महिलेस अस्वस्थ झाल्याने ती आणि तिच्यासोबतची आई अशा दोन्ही महिला रणरणत्या उन्हात कर्की फाट्यावर स्त्यातच बसलेल्या होत्या. त्या महिला संकटात असल्याचे पाहून अंतुर्ली ते मुक्ताईनगर या बसवर कर्तव्यावर असलेले चालक जी.एस.देवकर यांनी बस थांबविली. वाहक राजेश ठाकूर यांना विचारपूस करायला पाठवले. त्यांच्या चौकशीअंती असे लक्षात आली की, ती महिला सात महिन्यांची गरोदर असून त्या मायलेकी खंडवा (मध्य प्रदेश) येथून येत आहेत. त्यात ती गरोदर महिला व तिची आई उपाशीपोटी भरउन्हात बरेच किलोमीटर पायी प्रवास करत आलेली आहे. आपल्या गरोदर मुलीला चक्कर येत आहे, तसेच तिला ऊन लागले, अशी तिची आई सांगत असताना रडायला लागली. चालक व वाहक यांनी त्या दोघींना मुक्ताईनगरला आणले. आधी त्यांच्या फराळाची व्यवस्था केली. तसेच त्यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले केले. त्यांच्याकडे पैसेही कमी होते व त्यांना अजून अकोला जायचे आहे, असे सांगताच वाहक राजेश ठाकूर यांनी मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत करत आणखी काही मदत लागल्यास फोन नंबर देऊन संपर्क करण्याची विनंती केली.त्या दोघा मायलेकींनी चालक देवकर व ठाकूर यांचे मनापासून आभार मानले. प्रवाशी हेच दैवत... प्रमाणे दोघांनी एसटीची प्रतिमा जनमानसात अजून उंचावेल अस कार्य केले आहे व देशसेवेत हातभार लावलेला आहे, अशी भावना या वेळी उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.महिला ही सहा महिन्यांची गरोदर आहे. गरोदरपणात मोठे अंतर पायी चालणे व उन्हामुळे तिला डिहायड्रेशन झाले होते. तिच्यावर उपचार करून तब्बेत स्थिर झाल्यावर कोविड कक्षात ठेवण्यात आले आहे.-डॉ.निकिता मराठे, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर