शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोहल्यावर चढण्याआधीच रिजवानवर काळाची झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 16:37 IST

बोहल्यावर चढण्याआधीच रिजवान कुरेशी याच्यावर काळाने झडप घातल्याची घटना सायगाव येथे घडली.

ठळक मुद्देसायगाव : कुरेशी कुटुंबियांवर आघात‘अर्र्ध्यावरती डाव मोडिला अधुरी एक कहाणी....’

गोकुळ मंडळसायगाव, ता चाळीसगाव, जि.जळगाव : बोहल्यावर चढण्याआधीच रिजवान कुरेशी याच्यावर काळाने झडप घातल्याची घटना सायगाव येथे घडली.चोपडा येथील रहिवाशी असलेले शेख अहेमद शेख आलम कुरेशी हे सर्वसाधारण व गरीब कुटुंब. आपल्या दोन्ही मुलांची कामाची घडी बसावी आणि सुखी जीवन जगावे हे स्वप्न उराशी बाळगून कुरेशी कुटुंब पत्नी, दोन मुले, पाच मुलींसह चोपडा येथून २५ ते ३० वर्षांपूर्वी सायगाव येथे स्थायिक झाले. रिजवान हा मोठा मुलगा. त्याचे मोबाइल रिपेअरींगचे छोटेखानी दुकान, तर लहान मुलगा जमाल याचे पिलखोड येथे गॅरेज असा दोन्ही भावडांचा व्यवसाय सुरळीत सुरू होता. दोन्ही भावंडांची आपल्या व्यवसायावर मजबूत पकड होती. वडील अहेमद कुरेशी यांनी आपला मोठा मुलगा रिजवानचे लग्न करायचे ठरविले. अशातच मालेगाव येथील शखे अस्पाक शेख शरीफ यांच्या मुलीशी लग्न जमले. दोन्ही कुटुंबांनी ठरवून २१ जुलै रोजी मालेगाव येथे साखरपुडा केला. लवकरच दोन्ही कुटुंब लग्नाची तारीख ठरविणार होते. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. ३० जुलै रोजी सकाळी रिजवानच्या छातीत दुखू लागले. कुटुंबीयांनी उपचारार्थ हलविले. मात्र त्याचा मृत्यू झाला. तो स्वभावाने अत्यंत शांत होता आणि तो सायगाव परिसरातील मित्रांचा लाडका होता. त्याच्या जाण्याने मित्रांमध्ये आणि विशेष करून घरात सर्वात मोठी पोकळी निर्माण झाली. क्षणार्धात दोन्ही कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.यामुळे संपूर्ण सायगाव व परिसरात स्तब्धता पसरली आणि प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य होते, ‘हे काय झाले, असे व्हायला नको होते आणि प्रत्येक जण गोड स्वभावाचा रिजवान गेल्यामुळे हळहळत होता. शेवटी एवढेच म्हणावे लागेल, ‘अर्र्ध्यावरती डाव मोडिला अधुरी एक कहाणी....’

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव