शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

रेड झोन नको, तर लॉकडाऊन कडक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:07 IST

मनपा प्रशासनावर दबाव : रुग्ण संख्येत वाढ

जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या ३४८ इतकी झाली आहे. तसेच दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. शासनाकडून जाहीर झालेल्या झोन मध्ये जळगाव शहर रेडझोनमध्ये आहे. अशा परिस्थितीत शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात यावी यासाठी किमान १४ दिवस शहरात कडक लॉकडाऊन करण्यात यावा यासाठी मनपा प्रशासनावर दबाव वाढत आहे. नगरसेवकांसह व्यापाऱ्यांनी देखील शहरात १४ दिवस लॉकडाऊन करण्याची मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली आहे. जोपर्यंत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार नाही,+ तोवर शहरातील कोरोनारुग्णांची संख्या आटोक्यात येणार नाही असे मत नगरसेवक व व्यापाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.शहरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे जळगाव शहर पाचव्या लॉकडाऊनमध्येही रेडझोनमध्ये कायम आहे. त्यामुळे शासनाने पाचव्या लॉकडाऊनमध्ये ज्याठिकाणी रेडझोन नाही अशा शहरांमध्ये व्यापाराला व सर्व प्रकारच्या व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जळगाव शहर रेडझोन मध्ये असल्याने शहरात मार्केटमधील दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिलेली नाही. तसेच स्थानिक स्तरावर दुकाने उघडण्याबाबत मनपा प्रशासनही शासनाच्या बाहेर जाण्यास तयार नाही. मात्र, शहरात मार्केटव्यतिरीक्त इतर व्यवसाय सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बाजारात गर्दी कायम आहे.तर शहर रेडझोनमधून बाहेर येणारच नाहीएकीकडे शहरातील मार्केटवगळता इतर दुकाने सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरात गर्दी वाढतच जाणार आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे रुग्ण देखील वाढत जातील व शहर रेडझोनमध्येच कायम राहिल. शासनाच्या आदेशाप्रमाणे शहर रेडझोनमध्ये राहिंल्यास त्याठिकाणी मार्केटमधील दुकाने व मॉल्स उघडू शकत नाहीत. त्यापेक्षा प्रशासनाने काही दिवस लॉकडाऊन पाचमध्ये आणलेली शिथिलता कमी करून १४ दिवस कडक लॉकडाऊन पाडण्यात यावा अशी मागणी मंगळवारी फुले मार्केटसह इतर मार्केटमधील व्यापाºयांनी केली. कडक लॉकडाऊन पाडण्यात आला तर निदान कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण येईल. त्यामुळे शहर रेडझोनमधून बाहेर येवून व्यापाराला पोषक वातावरण निर्माण होईल असे मत व्यापाºयांनी व्यक्त केले.तर शहर रेडझोनमधून बाहेर येणारच नाहीएकीकडे शहरातील मार्केटवगळता इतर दुकाने सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरात गर्दी वाढतच जाणार आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे रुग्ण देखील वाढत जातील व शहर रेडझोनमध्येच कायम राहिल. शासनाच्या आदेशाप्रमाणे शहर रेडझोनमध्ये राहिंल्यास त्याठिकाणी मार्केटमधील दुकाने व मॉल्स उघडू शकत नाहीत. त्यापेक्षा प्रशासनाने काही दिवस लॉकडाऊन पाचमध्ये आणलेली शिथिलता कमी करून १४ दिवस कडक लॉकडाऊन पाडण्यात यावा अशी मागणी मंगळवारी फुले मार्केटसह इतर मार्केटमधील व्यापाºयांनी केली. कडक लॉकडाऊन पाडण्यात आला तर निदान कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण येईल. त्यामुळे शहर रेडझोनमधून बाहेर येवून व्यापाराला पोषक वातावरण निर्माण होईल असे मत व्यापाºयांनी व्यक्त केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव