शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निषेध कसला करताय, घुसून दहशतवाद्यांना गोळ्या घाला : उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 12, 2017 17:44 IST

अमरनाथ यात्रेकरूंना संरक्षण देता आले नाही का?

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि.12-  दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला जाणा:या भाविकांच्या बसवर हल्ला केला़ हिंदुस्थानवर हल्ले होत असतांना निषेध कसला करताय, जा़़़ घुसा आणि दहशतवाद्यांना गोळ्या घाला, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी शेतकरी संवाद यात्रेदरम्यान धुळ्यात केंद्र सरकारला दिल़े 
आपल्या भाषणात ठाकरे म्हणले, बाळासाहेब असतांना त्यांनी अमरनाथ यात्रेला अडथळा आला तर हज यात्रा होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती़ पण सध्या केंद्र सरकार अतिरेकी हल्ल्यांनंतर केवळ निषेधावरच समाधान मानत आह़े हिंदुस्थान हे हिंदुराष्ट्र आहे, म्हणूनच आम्ही मोहन भागवतांचे नाव राष्ट्रपती पदासाठी पुढे केले होत़े त्यामुळे निषेध कसला करताय, घुसून दहशतवाद्यांना गोळ्या घाला असे आव्हान त्यांनी केंद्र सरकारला दिले.
कजर्माफीचा मुख्यमंत्र्यांना विधानसभेत जाब विचारणार
 शेतक:यांना कजर्माफी जाहीर करण्यात आली असली तरी शेतकरी अजूनही लाभापासून वंचित आहेत़ त्यामुळे किती शेतक:यांना कजर्माफी मिळाली, याचा जाब मुख्यमंत्र्यांना विधानसभेत विचारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
..तर मंत्रालयासमोर ढोल बडवू
जिल्हा बँका कजर्वसुलीसाठी शेतक:यांच्या घरासमोर ढोल बडवितात म्हणून आम्ही राज्यभर जिल्हा बँकांसमोर ढोल बडविल़े परंतु तरीही कजर्माफीचा लाभ दिला गेला नाही तर मंत्रालयासमोर ढोल बडवू असे ठाकरे म्हणाल़े कजर्माफीच्या मागणीची फॅशन झाली आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केल्याचेही  ठाकरे यांनी स्पष्ट केल़े भाजप नेत्यांचे गोडवे गाणा:या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर देखील त्यांनी टिकास्त्र सोडल़े
मोदींना शेतक:यांचे मन कळायला हवे
देशाचे पंतप्रधान मन की बात करीत असले तरी शेतक:यांनाही मन आहे, हे त्यांना कळायला हव़े शिवसेना शेतक:यांच्या कजर्माफीसाठी संघर्ष करीत असून त्यांचा आवाज बुलंद करीत आह़े अजित पवार यांनी शिवसेना दुतोंडी गांडूळ असल्याची टिका केल्याचे सांगत ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिल़े पवार यांनी केलेले वक्तव्य शेतकरी विसरले नसून जनतेने त्यांना लाथाडले आह़े भाजपने तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोंबला असल्याने ते शिवसेनेवर टिका करीत असल्याचे ठाकरे म्हणाल़े 
 दानवेंवर अप्रत्यक्ष टिका
शेतक:यांना ‘साले’ म्हणतात, मग तुमच्यात अन् अजित पवारांमध्ये फरक काय? असा प्रश्न करीत उध्दव ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली़ 
धुळे शहरातील बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या या शेतकरी संवाद मेळाव्यास पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री दादा भूसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार निलम गो:हे, बबन थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतिष महाले यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े