शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

बाबा ट्रॅव्हलमध्ये जळगावचे तिघे मयत

By admin | Updated: May 31, 2014 08:06 IST

भाग्यवंत कुटुंब हे फॅमिली टूरसाठी जाणार होते. त्यामुळे त्यांचे काही सहकारी नागपूरात यापूर्वीच दाखल झाले होते.

घड्याळावरून पटली ओळख

भाग्यवंत कुटुंब हे फॅमिली टूरसाठी जाणार होते. त्यामुळे त्यांचे काही सहकारी नागपूरात यापूर्वीच दाखल झाले होते. बस पेटल्याची माहिती मिळाल्यानंतर चक्रधर भाग्यवंत यांचे कंपनीतील सहकारी पंकजसिंग कंडारे यांनी स्थानिक रुग्णालयात धाव घेतली. या ठिकाणी दिव्यांशू हा जखमी अवस्थेत दिसला. कंडारे यांनी नंतर शवविच्छेदन गृहात ठेवलेले मृतदेह पाहिले. चक्रधर यांच्या हातातील घड्याळाच्या आधारावर त्यांची ओळख पटली. कंडारे यांनी ही माहिती जळगावात त्यांच्या नातेवाईकांना सांगितली. त्यानुसार नातेवाईक गुरुवारी संध्याकाळी नागपूरकडे रवाना झाले.डीएनए टेस्टमुळे मिळाली मयत निष्पन्नभाग्यवंत यांचे नातेवाईक नागपूरात दाखल झाले. चक्रधर भाग्यवंत, रेखा भाग्यवंत आणि हनी उर्फ निरजा भाग्यवंत यांची ओळख पटविण्यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या कातडीचे नमुने घेतले. तसेच चक्रधर यांचे वडिल नामदेव आणि रेखा यांच्या आई लताबाई कोळी यांचे नमुनेे तपासणीसाठी हैद्राबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले. दुपारी अहवाल प्राप्त झाल्यानंतर तिघे मयत हे भाग्यवंत कुटुंबीय असल्याचे निष्पन्न झाले .दिव्यांशूवर नागपूरात उपचारया आगीत दिव्यांशू भाग्यवंत हा बालक २७ टक्के भाजला आहे. त्याच्यावर नागपूरातील सिम्स् हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. त्याच्या चेहर्‍यावर, डाव्या हाताला आणि पायाला भाजले आहे. जखमी दिव्यांशू याचा सारखा आईवडिलांसाठी धावा सुरु आहे. त्याच्याजवळ मामा सुरेश कोळी थांबून आहेत.भाग्यवंत कुटुंबीयांवर मूळ गावी अंत्यसंस्कारमयताची ओळख पटल्यानंतर तिघांचे मृतदेह चक्रधर भाग्यवंत यांच्या पुसद या मूळ गावी नेण्यात आले. या ठिकाणी शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्यांचावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सासू लताबाई कोळी, मामसासरे नरंेद्र बाविस्कर, नातेवाईक ज्ञानेश्वर मोरे, भागवत सैंदाणे, एकनाथ साळुंखे यांच्यासह जळगावातील नातेवाईक उपस्थित होते. मयत चक्रधर यांच्या पश्चात आईवडिल, एक भाऊ आणि दोन बहिण असा परिवार आहे.दौलत नगरातील घरी स्मशानशांततासर्वच नातेवाईक नागपूरकडे रवाना झाल्याने चक्रधर भाग्यवंत यांच्या दौलत नगर भागातील घरी एकट्या रेखा भाग्यवंत यांच्या आजी थांबून होत्या. शुक्रवारी दिवसभर भाग्यवंत यांच्या परिचयातील आणि नात्यातील व्यक्ती येत होते. एकाच वेळी कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने दौलत नगरातील त्यांच्या निवासस्थानी स्मशानशांतता पसरली होती.