दूरच्या देशात तीन मजली लाँचने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 02:32 PM2019-03-13T14:32:22+5:302019-03-13T14:32:39+5:30

जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिल शहा यांनी बांगला देशात भेट दिली. त्यांच्या अनुभवावर आधारित लेखमालेचा आज दुसरा भाग ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत.

A three-storey journey to a remote country | दूरच्या देशात तीन मजली लाँचने प्रवास

दूरच्या देशात तीन मजली लाँचने प्रवास

Next

बांगला देशातील रंगबलीला १९७० मध्ये ‘भोला’ नावाच्या चक्रीवादळाने ५ लाख जीव घेतले आणि घरादारांची प्रचंड नासधूस केली. त्यानंतर १९९१ च्या ‘लॅण्डफॉलने दीड लाख तर २००७ च्या ‘सिदर’ने पुन्हा १० हजारांपेक्षा अधिक जीव घेतले. बाकी हानी झाली ती वेगळीच.
बांगला देशातील या अवघड ठिकाणी ‘रोटरी’ आणि ‘सर्व्हिस सिव्हील इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय सेवा संस्थांनी मिळून सहायता केंद्र उभारले आहे. इतरही काही आंतरराष्ट्रीय संस्था तेथे मदत करीत आहेत. या केंद्रामुळे माणसे आणि गुरेढोरे यांच्या जीवित हानीचे प्रमाण आता खूप कमी झाले आहे. चक्रीवादळाचा धोका मात्र कायम आहेच.
आम्ही आधी विमानाने मुंबईहून कोलकाता आणि तेथून ढाक्याला रात्री पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ढाक्यातल्या बुरीगंगा (बं.उ. बुरी गॉन्गा) नदीवर असलेल्या सदर घाट बंदरावर पोहोचलो. बुरी म्हणजे जुनी, पुरातन. पण बरी नक्कीच नव्हती. प्रचंड घाण, या नदीचे पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. ढाक्क्यात तिचे पाणी पिण्यालायक नाही, असा शिक्का तिच्यावर पडला आहे. बंदरावरून काही खाण्याचे पदार्थ घेतले. कारण जेथे जाणार होतो तेथे खाण्यापिण्याची कोणतीच सोय नसणार होती. असली तरी तेथे मासे हे मुख्य अन्न म्हणजे आणची उपासमारच. कोणत्याही बंदरावर प्रवासासाठी आम्ही प्रथमच गेलो. बंदरावर गर्दी, आरडाओरड आणि लगबग भरपूर होती. इंग्रजीत तेथे सदर घाट टर्मिनल असा बोर्ड आहे.
बांगला देश हा नद्यांचा देश आहे. या देशात ७०० नद्या आहेत आणि त्यातून जाणारे २४ हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे जलमार्ग आहेत. त्यातून होड्या, बोट, स्पीड बोट, लाँच इ.द्वारे वाहतूक आणि प्रवास होत असतो. उन्हाळ्यात यातले जवळपास ५० टक्के मार्ग सुरू असतात.
रंगबलीला पोहोचण्याचा आमचा प्रवास जलमार्ग आणि मधेमध्ये जमिनीवरून होता. पहिला टप्पा होता बारिसाल. (बं.उ. बॉरिसॉल) जलमार्गाने हे अंतर आहे ४८० किलोमीटर. हे दक्षिण बांगला देशातले मोठे शहर आहे. तेथे विद्यापीठही आहे. हा प्रवास आम्ही एम.व्ही.अ‍ॅडव्हेन्चर-९ या तीन मजली लॉन्चने केला. बांगला देशातल्या काही लोकांना संपर्क करून याचे बुकींग आधीच करून ठेवले होते म्हणून बरे झाले. नाही तर जागाच मिळाली नसती इतकी गर्दी.
लॉन्च जेथे धक्क्याला लागली होती. तेथे लाकडी फळ्यांवरून त्यात जायचे होते. लॉन्चच्या प्रवेशाकडचे तळमजल्याचे मोकळे छत निळ्या पांढऱ्या एलईडीच्या दिव्यांची खैरात करत छान सजवलेले होते. तेथे अशा सहा-सात लॉन्च धक्क्याला लागलेल्या होत्या. लोक त्यांच्या लॉन्चमध्ये येण्यासाठी मोठ्याने ‘बॉरिसॉल बॉरिसॉल’ असा आरडाओरडा करीत गिºहाईकांना बोलावित होते. लॉंच ३२५ फूट लांब व ५५ फूट रुंद होती. तळमजल्यावर सरळसोट हॉल होता. त्यात लॉन्चचे खांब होते. ही डॉर्मिटरी. आपापली पथारी घेऊन या, जागा मिळेल तेथे अंथरा व झोपा. आम्ही दुसºया मजल्यावरच्या २ केबिन बुक केल्या होत्या. केबिनमध्ये जाताच आश्चर्याचा धक्काच होता. केबिन एकदम चांगली होती. (क्रमश:)
सी. ए. अनिल शहा, जळगाव
मोबाईल ९४२२२ ७६ ९०२

Web Title: A three-storey journey to a remote country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.