शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात अतिक्रमणात बांधण्यात आलेली तीन दुकाने केली उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 23:50 IST

भुसावळ : शहरातील अतिक्रमणाने डोकेच नाही तर संपूर्ण शरीर वर काढले होते. राजकीय मंडळींच्या अतिक्रमणावर हातोडा चालणार की फक्त ...

ठळक मुद्देअतिक्रमण हटाव मोहीम सुरूराजकीय गोटात खळबळ

भुसावळ : शहरातील अतिक्रमणाने डोकेच नाही तर संपूर्ण शरीर वर काढले होते. राजकीय मंडळींच्या अतिक्रमणावर हातोडा चालणार की फक्त नियम सर्वसामान्यसाठीच आहे? नागरिकांमध्ये असे संभ्रम असताना मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी धाडसी कारवाई करत अतिक्रमण केलेल्या बाजारातील जागेसह सुमारे ५० लाख किमतीची असलेली व नुकतेच बांधकाम पूर्ण झालेले तीन दुकाने जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे राजकीय गोटांमध्ये खळबळ उडाली आहे.शहरात यावल रोड असो, जामनेर रोड असो जळगाव रोड असो की मुख्य बाजारपेठ प्रत्येक भागामध्ये जणूकाही मालकीच्या जागेपेक्षा अतिक्रमणामुळे शहराच्या मुख्य रस्त्यांची कोंडी होऊन श्वास कोंडला गेला आहे. यातच काही राजकीय मंडळी पदाचा गैरउपयोग करून अतिक्रमण करीत आहेत. याबाबत सातत्याने तक्रारी होत्या, अतिक्रमणाबाबत फक्त हातगाडी, लोटगाडी टपरीधारकांवर कारवाईचा बडगा उघडण्यात येत होता. यातून अतिक्रमण फक्त सर्वसामान्यांसाठी तर नियम नाही ना असा संदेश सामान्य नागरिकांमध्ये जात होता, मात्र आजच्या झालेल्या कारवाईमुळे संपूर्ण शहरांमध्ये अतिक्रमित केलेल्या मंडळींमध्ये घबराट पसरली आहे.राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने मरीमाता मंदिरासमोर दोन अनधिकृत दुकानाचे बांधकाम करण्यात आले होते. शिवाय ही दुकाने या दुकानाचे काम स्लॅप लेव्हलपर्यंत आल्यानंतर जागेसह ५० लाखाच्या किमती व्यवहाराची चर्चा असताना या बेकायदा बांधकामाची तक्रार करण्यात आल्यानंतर पोलीस बंदोबस्तात व पालिकेच्या पाच पथकाच्या उपस्थित मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी हातोडा मारून जेसीबीला दुकान तोडण्याचा इशारा दिला. या कारवाईमुळे ज्यांनीही अतिक्रमण केलेले आहे त्यांच्या तंबूत घबराट पसरली आहे.अग्निबंब, रुग्णवाहिका जाण्यासही जागा नाहीशहरात अतिक्रमण इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढले आहे की एखादी दुर्दैवी घटना घडल्यास बाजारपेठेत आग विझविण्यासाठी अग्नि बंबाची गाडी किंवा रूग्णाला अत्यावश्‍यक उपचारार्थ हलविण्यासाठी ॲम्बुलन्ससुद्धा या गल्लीतून जाऊ शकत नाही.

टॅग्स :GovernmentसरकारBhusawalभुसावळ