शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांच्या दगडफेकीत तीन पोलीस जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 11:57 IST

जळगाव तालुक्यातील खेडी येथील घटना

ठळक मुद्देगिरणा नदी पात्रात मध्यरात्रीचा थरार

जळगाव : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुध्द कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर वाळूमाफियांनी तुफान दगडफेक केली. यात तीन पोलीस जखमी झाले. तालुक्यातील खेडी येथील गिरणा नदी पात्रात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी १५ जणांविरुध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.योगेश पाटील, तौसिफ पठाण व ज्ञानेश्वर चव्हाण अशी या जखमी पोलिसांची नावे आहेत. दरम्यान, वाळूमाफियांनी ट्रॅक्टरसोडून पलायन केले आहे. हे ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे.खेडी शिवारात गिरणा पात्रात अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार शिंदे यांनी शुक्रवारी रात्री नियंत्रण कक्षातून एक पथक रवाना केले. हे पथक नदीपात्रात पोहचताच १० ते १५ जणांच्या टोळक्याने पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक करायला सुरुवात केली. तरीही पोलिसांनी धाडस करीत ते भरलेल्या ट्रॅक्टरपर्यंत पोहचले. या दगडफेकीत वरील तीन पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी या वाळू पकडण्याचा प्रयत्न केला मात्र अंधार असल्याने पसार झाले. दरम्यान, या पोलिसांवर उपचार करुन त्यांची लगेच घरी पाठविण्यात आले. याप्रकरणी प्रकाश मन्याराम वाघ यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा वापरवाळू वाहून नेण्यासाठी वाळूमाफियांनी विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा वापर केला आहे. प्रत्येक ठिकाणी विना क्रमांक किंवा बनावट क्रमांकाचा वापर होत असल्याचे वेगवेगळ्या कारवायांवरुन सिध्द झाले आहे.खेडी येथील कारवाईतही ट्रॅक्टरचे धूड नवीन तर नंबर खोडलेल्या ट्रॉलीचा वापर करण्यात आला आहे. वाळूसहीत सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनीच हे ट्रॅक्टर चालवून पोलिस ठाण्यात आणून जप्त केले आहे. याप्रकरणी प्रकाश मन्याराम वाघ यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी