मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील अंतुर्ली फाट्यालगतच्या केळी रायपनिग चेंबर ( केळी पिकविण्याचे शीतगृह) मध्ये स्फोट होऊन तीन जण ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास घडली. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील या घटनास्थळी महाराष्ट्र व मध्य प्रदेशचे पोलीस दाखल झाले आहेत.ओळख पटलेल्या एका मृताचे नाव शिवाजी दगडू साळुंखे असे आहे, तर अन्य दोघा मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. शेख हनीफ शेख हमीद हा इसम गंभीर जखमी झाले असून, त्यांना बºहाणपूर ( मध्य प्रदेश) येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे.केळी पिकवण्याच्या कोल्ड स्टोरेजमध्ये हा स्फोट येथे वापरण्यात येणाऱ्या इथिलीन सिलेंडरचा स्फोट घडल्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. स्फोट इतका जबर होता की, यात शीतगृहाच्या दोन खोल्यांची प्रचंड नासधूस होऊन लांब अंतरावर सिलेंडरचे अवशेष फेकले गेले. येथे उभ्या दुचाकी व रिक्षाचेही नुकसान झाले आहे.या घटनेत शिवाजी साळुंखे यांच्यासह अन्य दोघा अनोळखींचा मृत्यू झाला. शेख हनीफ शेख हमीद हा इसम गंभीर जखमी झाला असून, त्यांना बºहाणपूर येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे.दरम्यान, मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक अशोक कडलग हे सहकाºयांसह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, हे कोल्ड स्टोरेज शेख लुकमान शेख ईस्माईल यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात आले. कृषी योजनेंतर्गत हा केळी पिकविण्याचा प्रकल्प २०१५ मध्ये सुरू करण्यात आला होता.
अंतुर्ली येथे शीतगृहात स्फोट : तीन ठार, दोन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:36 IST
दोन जणांची अद्याप ओळख पटलेली नाही
अंतुर्ली येथे शीतगृहात स्फोट : तीन ठार, दोन जण जखमी
ठळक मुद्देघटनास्थळी महाराष्ट व मध्य प्रदेशचे पोलीस दाखल शीतगृहाच्या दोन खोल्यांची प्रचंड नासधूस जवळच उभ्या असलेल्या दुचाकी व रिक्षाचेही नुकसान