शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तालुक्यातील उपोषणकर्त्या तिघांची प्रकृती खालवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:47 IST

हिंगोणे ग्रामस्थांचे सहाव्या दिवशी उपोषण सुरुच

चाळीसगाव : तालुक्यातील हिंगोणे गावालगत असलेल्या तितूर नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुध्द कारवाईच्या मागणीसाठी हिंगोणे येथील ग्रामस्थांचे उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच होते. यातील तीन उपोषकर्त्यांची बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास प्रकृती खालावली.उपोषणकर्ते बाळासाहेब गजमल पाटील, ज्ञानेश्वर महाजन, सुरेश पाटील यांनी सांगितले की, वाळूचोरी प्रकरणात तहसीलदारांना अनेक वेळा वाळूचोरीविषयी लेखी व तोंडी माहिती देवूनही त्यांनी टाळाटाळ केली. आम्ही त्यांच्याकडे माहिती देत होतो. त्यावेळी संबंधितांना ते फोन करुन देत असत, असेही आरोप त्यांनी केला. त्यामुळे महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी जाताच त्या आधीच वाळूचोरटे पसार व्हायचे असा प्रकार अनेकवेळा पहायला मिळाला. तहसीलदारांचा या प्रकरणात संबंध होता तसेच माजी सरपंच तुषार रावण चव्हाण हे संबंधितांचे हस्तक असल्याचा आरोप करीत त्यादिशेने पोलीसांनी तपास करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.७० ते ७५ ब्रास हजार वाळू नदीपात्रातून चोरी जावूनदेखील पंचनाम्यात फक्त ३ हजार ब्रास वाळूची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वाळूचोरीचा फेरपंचनामा करुन इतर सक्षम अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी, दंडात्मक कारवाईची जबाबदारी प्रभाकर चौधरी यांच्यावर निशिचत करावी व त्यांच्याविरुध्द एमपीडीअन्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी उपोषणकर्त्यांची आहे. त्यासाठी सहा दिवसांपासून उपोषण सुरूच आहे. बुधवारी उपोषणस्थळी अ‍ॅड. साहेबराव पाटील, अ‍ॅॅड. सुभाष खैरनार, अ‍ॅॅड. राहुल पाटील यांनी भेट दिली.यांची प्रकृती खालावलीसहा दिवसांपासून उपोषण सुरू असल्याने बुधवारी हिंगोणे खुर्दचे उपसरपंच अरविंद भिमराव चव्हाण, दिलीप रामचंद्र पाटील व एकनाथ नामदेव कोष्टी या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवली. या सर्वांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव