शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात व्हेंटिलेटरअभावी कोरोनाचे तीन रुग्ण दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 15:04 IST

ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरला १० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, पण ते हाताळण्यासाठी यंत्रणा नाही.

भुसावळ : कोरोनाने जिल्ह्यासह तालुक्यात कहर केला आहे. भुसावळ शहरातील जळगाव रोडवरील साकेगाव हद्दीत असलेल्या ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनसुद्धा व्हेंटिलेटरअभावी तीन रुग्ण दगावले. यात दोन पुरुष तर एक महिलेचा समावेश आहे.१७ रोजी रात्री बोदवड तालुक्यातील ६० वर्षीय पुरुषास रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच गंभीर अवस्था होती, सात तास वेगवेगळे रुग्णालय फिरुनसुद्धा व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने ते भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरला दाखल झाले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय १८ रोजी सकाळी कासोदा, ता.एरंडोल येथील ६० वर्षीय पुरुष, न्हावी, ता.यावल येथील ६० वर्षीय महिला यांनाही व्हेंटिलेटरची नितांत आवश्यकता असताना वेळेवर व्हेंटिलेटर उपलब्ध न होणे, तांत्रिक अडचणी, याशिवाय अत्यंत कमी झालेले सँच्युरेशन व उपचाराला झालेला उशीर यामुळे मृत्यू ओढवला.दरम्यान, आजारांमध्ये कुठल्याही प्रकारची लपवालपवी न करता सुरुवातीलाच निदान केल्यास जास्त त्रास होत नाही. तरी बाधित रुग्णांनी त्वरित कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घ्यावे. वेळेवर उपचार करावा, अशी माहिती ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर चौधरी यांनी ह्यलोकमतह्णला दिली.एक दृष्टिक्षेपभुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ४० बेड उपलब्ध आहेत. मात्र यापेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना या ठिकाणी भरती केले आहे.या रुग्णालयात पीएम केअर निधीतून सात महिन्यांपूर्वी १० व्हेंटिलेटर देण्यात आले होते. या ठिकाणी पुरेसे डॉक्टर व कर्मचारी नसल्यामुळे हे व्हेंटिलेटर धूळखात पडून आहेत.कोरोना पॉझिटिव रुग्णांना व्हेंटिलेटरअभावी आपला जीव गमवावा लागला आहे.व्हेंटिलेटरची सुविधा सुरू करण्यासाठी तज्ज्ञ चार एमडी डॉक्टर व प्रशिक्षित तज्ज्ञ १० आयसीयू ट्रेनर नर्सेस यांची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ