शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरनजीक अपघातात तीन जण ठार, तीन जखमी;

By चुडामण.बोरसे | Updated: November 24, 2023 23:23 IST

समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने तीन वाहनांना कट मारल्याने झालेल्या विचित्र अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले.

जामनेर  ( जि. जळगाव) : समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने तीन वाहनांना कट मारल्याने झालेल्या विचित्र अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले. अपघाताची ही भीषण घटना जामनेर - बोदवड रस्त्यावरील मालदाभाडीनजीक शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.   मृतांमध्ये वाडीकिल्ला ता. जामनेर येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक  ईश्वर त्र्यंबक पारधी (४२, रा.मालदाभाडी, ता.जामनेर),  सुनिल शांताराम भोई (४५, रा. जामनेर रोड, बोदवड) आणि दत्तू रामा माळी (३०, रा. माळी वाडा, बोदवड) यांचा समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील भोई आणि दत्तू माळी हे दुचाकीने जामनेरहून बोदवडकडे निघाले होते. त्याच्यामागे ईश्वर पारधी हे ही दुचाकीने मालदाभाडीकडे निघाले होते. मालदाभाडीनजीक समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने या दोन्ही दुचाकी आणि त्यांच्यामागे असलेल्या चारचाकी वाहनाला कट मारला. यामुळे  दुचाकी बाजूला फेकल्या गेल्या आणि त्या एकमेकांवर आदळल्या. यात वरील तीनही जण जागीच ठार झाले. याचवेळी चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तीही रस्त्याच्या बाजूला जाऊन कोसळली.  यात चारचाकीतील तीन जण जखमी झाले आहेत.  ते पुण्याहून घाणखेड ता. बोदवडकडे निघाले होते. 

या पाठोपाठ एक पीकअप व्हॅन या रस्त्याने जात होती. त्यावरील चालकाने हा अपघात पाहिला आणि त्याचेही वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन पडले. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. यात वाहनात पाच ते सहा महिला होत्या. 

 अपघाताची माहिती मिळताच जामनेर येथून जालमसिंग राजपूत रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी पोहचले. मालदाभाडी, नवीदाभाडी व वाडीकिल्ला येथील ग्रामस्थांनी मदतकार्य केले.  तीनही मृतदेह रात्री जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. या ठिकाणी नातेवाईकांनी गर्दी केली होती. जामनेर येथील पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.