शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात वनपालासह तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 11:27 IST

जळगाव तालुक्यातील देऊळवाडा, सुजदे शिवारात थरार

ठळक मुद्दे शेतकऱ्यांमध्ये भीती

जळगाव : तालुक्यातील देऊळवाडे व सुजदे शिवारात मंगळवारी बिबट्याने धुमाकूळ घातला. शेतात काम करीत असलेल्या तरुणावर हल्ला केल्यानंतर बिबट्याच्या शोधासाठी आलेल्या वनपालासह आणखी एका शेतकऱ्यावर त्याने हल्ला केला. बिबट्याच्या या हल्लयामुळे गावकरी व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.दरम्यान, प्रमोद संजय सोनवणे (२०), देवचंद लक्ष्मण सोनवणे (५७, दोन्ही रा.देऊळवाडा, ता.जळगाव) या दोघांसह वनविभागाचे वनपाल जी.आर.बडगुजर (५१, रा.जळगाव) हे बिबट्याच्या हल्लयात जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्रमोद व देवचंद काका-पुतणे आहेत.बिबट्या व तरुणात दहा मिनिटे झुंजदेऊळवाडे येथील प्रमोद संजय सोनवणे हा तरुण शेतमजुर असून मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सुजदे शिवारातील दुसºयाच्या शेतात दादर कापण्याच्या कामासाठी गेला.दादर कापून झाल्यावर प्रमोद शेतातून घराकडे निघत असताना, पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. दोघांमध्ये १० मिनिटे झुंज चालली. यात प्रमोदने बिबट्याच्या मानेखाली बुक्का मारल्याने बिबट्या पळून गेला. यानंतर प्रमोदला त्याचा मित्र प्रकाश शालिक सोनवणे याला दुचाकीवरुन जिल्हा रुग्णालयात दाखल केले.बिबट्याने त्याच्या पाठीवर, दंडावर हातावर पंजे मारल्याने दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.पुतण्यानंतर वृध्द काकावर हल्लाप्रमोद हल्ला झाल्यानंतर दुपारी याच बिबट्याने दुसºया शेतात त्याचे वृध्द काका देवचंद लक्ष्मण सोनवणे यांंच्यावर हल्ला चढविला.देवचंद सोनवणे पिकाला पाणी भरण्यासाठी आले होते. पाणी भरत असताना काही कळण्याच्या आत त्यांच्यावर हल्ला झाला. यात त्यांच्या खाद्यावर, पोटावर जखमा झाल्या असून त्यांनाही त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.बिबट्याच्या शोधार्थ फिरणाºया वनपालावरही हल्लाबिबट्याच्या हल्लयाची माहिती मिळाल्यानंतर जळगाव परिक्षेत्रातील वनक्षेत्रपाल एन.जी.पाटील, वनपाल पी.जे.सोनवणे, वनपाल जी.आर.बडगुजर यांच्यासह २५ते ३० जणांना फौजफाटा दुपारी दीड वाजता बिबट्याला पकडण्यासाठी साहित्य तसेच वाहनासह सुजदे, देऊळवाडे शिवारात दाखल झाले. बिबट्याचा शोध सुरु असताना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने वनपाल बडगुजर यांच्यावर हल्ला केला.पोटावर तसेच दोन्ही मांड्यांवर चावा घेतल्याने बडगुजर जखमी झाले आहेत. इतर सहकाºयांनी त्यांना रुग्णालयात आणले.बिबट्याला पकडण्यासाठी लावले दोन पिंजरेवनविभागाचे उपवनसंरक्षक डी.डब्ल्यू. पगार यांना देऊळवाडे येथे बिबट्याने वनपालासह ग्रामस्थांवर हल्ला केल्याचे समजताच ते स्वत: सहकाºयांसह घटनास्थळी दाखल झाले. तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी एक पिंजरा लावण्यात आला. तर दुसरा पिंजराही मागविण्यात आला. सायंकाळी उशिरा दुसरा पिंजरा लावण्यात येत असल्याची माहिती पगार यांनी ‘लोकमत’ला दिली.