आर. बी. आर. कन्या माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. आपल्या भारतीय जवानांप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण असल्याने या सणापासून वंचित राहू नये, या भावनेतून विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी तीनशे राख्या स्वतः संकलित करून मुख्याध्यापक सुधीर महाजन यांच्याकडे सुपुर्द केल्या.
या राख्या नाशिक येथील कमांडर ॲटलरी कॅम्प, देवळाली येथे रवाना केल्या आहेत. उपक्रमासाठी सुनंदा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सरोजिनी बावस्कर, ईश्वर पाटील, हितेंद्र पाटील, सुनील पाटील, अजय पाटील, सुरेश चव्हाण, विवेक देशमुख, किसन राजपूत या शिक्षकांनी यात सहभाग नोंदवला.
170821\17jal_1_17082021_12.jpg
पहूर येथे आर. बी. आर. विद्यालयातील विद्यार्थीनींनी नाशिक येथे सुपुर्द करण्यासाठी सुधीर महाजन यांच्याकडे राख्या दिल्या.