शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भडगावात एकाच कुटुंबात तीन जणांची सामूहिक आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 18:29 IST

मुलाच्या विरहात टोकाचे पाऊन

भडगाव, जि.जळगाव : मुलगा सय्यद इसम बब्बू याच्या विरहात एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना भडगाव शहरातील टोणगाव भागात शनिवारी सकाळी उघडकीस आली. बब्बू लल्लन सय्यद (वय ४८), बब्बू यांची पत्नी पिंकी (वय ३८) व मुलगी स्नेहा (१५ वय) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.गेल्या आठवड्यात नऊ वर्षीय बालक सयद इसम सय्यद बब्बू याचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह पाचोरा रोडवरील रजनी देशमुख महाविद्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या केळीच्या शेतात सापडला होता. पोलिसांचा तपास सुरू असतानाच त्याचे वडील, आई व बहीण यांनी घरात साण्याच्या लोखंडी रॉडला दोर बांधून सामूहिक आत्महत्या केली. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याने समाजमन सुन्न झाले आहे. अशी ही येथील पहिलीच घटना आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, नेहमीप्रमाणे सय्यद परिवार शनिवारी पहाटे पाचला उठला. बब्बू सय्यद याने सकाळी घराच्या बाजूला मशिदीत ५.३० वाजता नमाज पठण केले. यानंतर घरात गेल्यावर दरवाजाची आतील कडी लावून आत्महत्या केली. बराच वेळ उलटल्याने ही घटना उघडकीस आली. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत अगोदर दरवाजाचा कडीकोंडा तोडला. तेव्हा बब्बू यांची पत्नी पिंकी व मुलगी स्नेहा या तिघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उपविभागीय अधिकारी नजीर शेख, पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे व पोलीस कर्मचारी आदींनी माहिती जाणून घेतली. जळगाव येथून श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला इलियास बेग मुराद बेग मिर्झा रा.भडगाव यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.ही आत्महत्या की घातपात याबाबत शहरात चर्चा होत आहे. दरम्यान, या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मात्र या घटनेचे कारण समजू शकले नाही. 

टॅग्स :Jalgaonजळगाव