शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात तीन माजी महापौर, २ नगरसेवक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 14:45 IST

प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिवसेनेकडून नितीन लढ्ढा, विष्णु भंगाळे व राखी सोनवणे हे तीन माजी महापौर व शिवसेनेच्या महानगराध्यक्षांच्या पत्नी नगरसेविका ज्योती तायडे असे चार विद्यमान नगरसेवक तर भाजपाकडून विद्यमान नगरसेवक व भाजपाचे मनपातील गटनेते सुनील माळी आपले नशिब अजमावत आहेत.

ठळक मुद्देशिवसेनेच्या दिग्गजांना लढत देण्याचे आव्हाननितीन लढ्ढा, विष्णु भंगाळे व राखी सोनवणे रिंगणातविष्णू भंगाळे यांना सुनील माळी यांचे आव्हान

जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिवसेनेकडून नितीन लढ्ढा, विष्णु भंगाळे व राखी सोनवणे हे तीन माजी महापौर व शिवसेनेच्या महानगराध्यक्षांच्या पत्नी नगरसेविका ज्योती तायडे असे चार विद्यमान नगरसेवक तर भाजपाकडून विद्यमान नगरसेवक व भाजपाचे मनपातील गटनेते सुनील माळी आपले नशिब अजमावत आहेत. याखेरीज राष्टÑवादी, काँग्रेसचे उमेदवारही रिंगणात आहेत.अपक्षांबाबत मात्र गुरूवारी रात्रीपर्यंत प्रशासनाकडून माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.माजी महापौर व खाविआचे सभागृहनेते नितीन लढ्ढा, माजी महापौर राखी सोनवणे यांचा प्रभाग क्र.८, श्यामकांत सोनवणे व वर्षा खडके यांच्या प्रभाग क्र.९ चा काही भाग, नरेंद्र भास्करराव पाटील व ज्योती तायडे यांचा प्रभाग क्र.२० पूर्ण व भाजपा गटनेते सुनील माळी, कंचन सनकत यांच्या प्रभाग ७ चा काही भाग मिळून हा नवीन प्रभाग क्र.५ तयार झाला आहे.शनिपेठ, बळीरामपेठे, भवानीपेठ, पोलनपेठ, नवीपेठ, जयकिसन वाडी, सिव्हील हॉस्पिटल, दीक्षितवाडी, वानखेडे सोसायटी, ओंकारनगर, गांधीनगर, खान्देश मिल सोसायटी, शाहूनगर, इंदिरानगर अशी व्याप्ती असलेल्या प्रभाग क्र.५ मध्ये एकूण लोकसंख्या २३ हजार ३१५ आहे.भंगाळे-माळी लढत‘५-अ’च्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार माजी महापौर विष्णू भंगाळे, भाजपाचे नगरसेवक सुनील माळी व काँग्रेसच्या जयश्री कदम रिंगणात आहेत. विष्णू भंगाळे यांची नगरसेवकपदाची ही तिसरी टर्म असून आता चौथ्यांदा नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवित आहेत. सत्ताधारी खान्देश विकास आघाडीकडून त्यांनी स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले. तर एप्रिल २०१२ मध्ये महापौरपदी त्यांची निवड झाली होती. त्यांच्या विरोधात भाजपाचे मनपातील गटनेते व विद्यमान नगरसेवक सुनील माळी हे रिंगणात आहेत. त्यांचीही ही दुसरी टर्म असून तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. तर काँग्रेसच्या जयश्री कदम व राष्टÑवादीचे हेमेंद्र महाजन पहिल्यांदाच निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे विष्णु भंगाळे व सुनील माळी अशीच लढत रंगण्याची शक्यता आहे.ज्योती तायडे-आकांक्षा शर्मा लढत५- क साठी शिवसेनेच्या ज्योती शरद तायडे रिंगणात आहेत. त्यांची नगरसेवकपदाची ही तिसरी टर्म असून आता चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. तर भाजपाच्या आकांक्षा देवेश शर्मा, राष्टÑवादीच्या सादिका शेख पहिल्यांदाच निवडणूक लढवित आहेत. आकांक्षा ह्या मनपाच्या सेवानिवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी स्व.निर्मला शर्मा यांच्या स्रुषा आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिका