शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात तीन दिवसीय मैत्र संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 16:04 IST

फैजपूर , ता.यावल, जि.जळगाव : येथील धनाजी नाना महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे तीन दिवसीय चौथे मैत्र संमेलन उत्साहात पार पडले ...

ठळक मुद्देमित्र-मैत्रिणींनी दिला शालेय जीवनातील आठवणींना उजाळासर्व मित्र व मैत्रिणींनी विविध कलाविष्कार केले सादर

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : येथील धनाजी नाना महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे तीन दिवसीय चौथे मैत्र संमेलन उत्साहात पार पडले झाले. यात मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी दीपप्रज्वालन, सरस्वती पूजन आणि माजी मंत्री बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन पुष्पहार अर्पण करून संमेलनाची सुरुवात झाली.व्यासपीठावर अजित पाटील आणि प्राचार्य पी.आर चौधरी तसेच ग्रुपचे सर्व अ‍ॅडमिन हर्षद मेहता, प्रकाश पाटील, जीवन चौधरी व आर.वाय.चौधरी उपस्थित होते.उपस्थित सर्व मित्र मैत्रिणींनी आपला परिचय करुन दिला. दोन-तीन वर्षांच्या मैत्रसमूहांच्या छायाचित्रांचे भरविलेले प्रदर्शन पाहून परिसरात फेरफटका मारला व गत स्मृतींना उजाळा देण्यात आला. त्यानंतर हिंदी, मराठी गाण्यांच्या भेंड्या रंगल्या व जुन्या आठवणींचे मोहोळ सर्वांच्याच मनात उठले. त्यानंतर सभागृहात सारे पुन्हा एकत्र आले.सर्व मित्र व मैत्रिणींनी विविध कलाविष्कार सादर केले. त्यात गाणी, कविता आणि अनुभवकथन झाले. तत्पूर्वी दुपारच्या सत्रात प्रा.वैशाली चौधरी व विजय भिरुड यांनी हौजी गेममध्ये सर्वांना सहभागी करून घेत बालपणाच्या जगात फिरवून आणले.दुसऱ्या दिवशी सुकी नदीवरील गारबर्डी येथे धरणावर सहलीसाठी सारे मित्रमैत्रिणी रवाना झाले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा.मंजू नाईक -बोरकर व प्रा.आनंदा चौधरी यांनी केले.माजी विद्यार्थी आणि याच महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक वाय.एम.पाटील यांनी सुरेल आवाजातील भावगीत आणि गझल गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.तिसºया दिवशी समारोप झाला. सूत्रसंचालन हेमंत पोतदार यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत प्रा.लक्ष्मी पोलडिया-गोसर, वसई यांनी केले. संमेलन यशस्वितेसाठी आर.वाय.चौधरी, जीवन चौधरी, प्रकाश पाटील, एल.ओ.चौधरी, अनिल महाजन, लक्ष्मी पोलडिया, हर्षद गुजराथी, अलका भानगावकर, गुणवंत टोंगळे, प्रभाकर चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Educationशिक्षणFaizpurफैजपूर