शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात पुन्हा तीन कोरोना ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 22:32 IST

अत्यावश्यक वस्तू घरपोच : मयत संशयितांच्या नातेवाईकांना केले क्वारंटाईन, एकूण रुग्ण संख्या १३

अमळनेर : जळगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतल्यापैकी येथील तीन रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून ते पॉझिटीव्ह आले आहे. त्यात अमळनेर अमलेश्वर नगर येथील एका १७ वर्षीय तरुणाचा व ४४ वर्षीय प्रौढाचा तसेच शाह आलमनगरातील ६७ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.शनिवार पर्यंत अमळनेर शहरात ९ तर मुंगसे येथे एक असे एकूण १० कोरोना रुग्ण आढळले होते. रविवारी येथील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १३ इतकी झाली आहे. दरम्यान तिघा मयत संशयित रुग्णांचा अहवाल आला नसला तरी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. अक्षयतृतीयाच्या दिवशी देखील हॉटस्पॉट झोन मध्ये सर्व्हे करण्यात आला. दरम्यान या झोनमध्ये पूर्णत: संचारबंदी करण्यात आली आहे. शहरातील तांबेपुरा , सानेनगर व अमलेश्वर नगर भागातील तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यांना प्रथमदर्शनी कोरोना सदृष्य लक्षणे दिसत असल्याने जिल्हा रुग्णालयात स्वॅब घेण्यासाठी रवाना केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रताप हॉस्टेल आणि आंबेडकर वसतिगृहात संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. प्रांताधिकारी सीमा आहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी विलास महाजन, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे सतर्क असून उपाययोजना करीत आहेत.