शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक झालेल्या तरुणाची आत्महत्या, पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:27 IST

व्हिडीओ व्हायरल

जळगाव : नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक झालेल्या आदीनाथ दत्तू भिंगारे (२०, रा.देवळाली प्रवरा, ता.राहुरी, जि.अहमदनगर)या तरुणाने शुक्रवारी सकाळी पाचोरा येथे रेल्वेखाली आत्महत्या केली. पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्यावी, अन्यथा तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी कंपनीच्या लोकांनी दिली होती, त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा असून तशी माहिती व कंपनी कशी फसवणूक करते याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.काय आहे नेमका प्रकारखेडी पेट्रोल पंपाच्या मागे ओम साई नगरात एका अलिशान इमारतीत नारायणी असोसिएटस् फ्रॅँचाइजी, ग्लेझ ट्रेडींग कंपनीचे(दिल्ली) कार्यालय उघडण्यात आले आहे. ओमप्रकाश कुमार याने जिल्ह्याची फ्रँचाइजी घेतलेली आहे. आदीनाथ दत्तू भिंगारे या तरुणाला अविनाश विक्रम काळे याने डाटा एन्ट्रीची नोकरी मिळेल असे सांगून जळगावात बोलावून घेतले. जेवणाचा खर्च सांगून त्याच्याकडून १८ हजार रुपये घेण्यात आले.डाटा एन्ट्रीचे काम न देता त्याच्या हातात सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू विक्रीसाठी देण्यात आल्या. या वस्तू विक्री होत नसल्याने त्याने या वस्तू परत केल्या, मात्र त्यांनी वस्तू परत घेतल्या जात नाहीत, तुला त्या विक्री कराव्याच लागतील असे सांगून हाकलून लावले. त्याने भरलेले पैसे परत मागितले असता ते देखील दिले नाहीत. गावाला परत जाण्यासाठी भाड्यालाही पैसे नसल्याने भिंगारे याने एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून फसवणूक झाल्याची तक्रार केली होती.आदीनाथ गरीब कुटुंबातील मुलगाआदीनाथ भिंगारे हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा होता. जळगावला तो २८ जून रोजी आलेला होता. येथे येण्यापूर्वी तो राहुरी फॅक्टरी येथे धनलक्ष्मी या लॉजमध्ये कामाला होता.कागदावर घेतल्या जबरदस्तीने सह्याअहमदनगरच्या एका तरुणाने आदीनाथच्या बाबतीतची फसवणुकीच माहिती व बिहारमधील एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल केलेला आहे. त्यात पोलिसात दिलेली केस मागे घे, नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही असे धमकावत आहेत. तुझे पैसे परत करतो असेही त्यांच्याकडून सांगितले जात आहे. दरम्यान, कंपनीच्या लोकांनी काही कागदावर आदीनाथच्या जबरदस्तीने सह्या घेतल्या. याबाबत मी काय करु काहीच सूचत नाही असे आदीनाथने आपल्याला सांगितल्याचा दावा नगरच्या मित्राने केला आहे. भाड्याला पैसे नसतील किंवा कंपनीवाले पैसे देत नसतील तरीही आहे त्या परिस्थितीत निघून ये असे आपण आदीनाथला समजावले असेही या तरुणाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत एमआयडीसी पोलिसांशी संपर्क करुन त्याला मदत करण्याचे सांगितले होते. त्यानंतर दोन दिवस आदीनाथशी संपर्कच झाला नाही.तरुणाने आत्महत्या केल्याचे समजले. तक्रार मागे घेण्याबाबत त्याला धमकावले जात असल्याचे ऐकले आहे, मात्र अजून तशी तक्रार कोणी केलेली नाही. आतापर्यंत कंपनीच्या केलेल्या चौकशीत भाडे करारनामा, शॉप अ‍ॅक्ट, अन्न सुरक्षा व फ्रॅँचाईजीबाबतचे सर्व कागदपत्रे नियमात असल्याचे आढळून आले आहे. आणखी चौकशी सुरु आहे.-अतुल वंजारी, तपासाधिकारी

टॅग्स :Jalgaonजळगाव