शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यातील साकरी येथून हजारो ब्रास गौणखनिज उचलण्याचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 16:26 IST

भुसावळ तालुक्यातील साकरी येथील येथील पाझर तलावातून राष्ट्रीय महामागार्साठी जिल्हाधिकाºयांनी १० हजार ७१३ ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली आहे. ठेकेदाराने मात्र २० ते २५ डंपर डंपर लावून रात्रंदिवस हजारो ब्रास गौणखनिज उचलण्याचा सपाटा सुरू केला आहे.

ठळक मुद्देपरवानगी सहा डंपर लावण्याची, डंपर लावले मात्र तीन ते चार पटस्थानिक ग्रामस्थांनी हरकत घेतल्यानंतर प्रकार आला उघडकीसजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची ऐशी तैशी

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकरी येथील येथील पाझर तलावातून राष्ट्रीय महामागार्साठी जिल्हाधिकाºयांनी १० हजार ७१३ ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली आहे. ठेकेदाराने मात्र २० ते २५ डंपर डंपर लावून रात्रंदिवस हजारो ब्रास गौणखनिज उचलण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे या प्रकारासंदर्भात नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून, शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ग्रामस्थांनी या डंपरला अटकाव केल्यामुळे प्रकार उघडकीस आला आहे.दरम्यान, ग्रामस्थांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना हा प्रकार दूरध्वनीवरून सांगितला. मात्र ठेकेदारावर कोणतीही कारवाई न करता तहसीलदारांनी केवळ समज दिली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गौणखनिज चोरी कुणाच्या आशीवार्दाने सुरू आहे, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच गौणखनिज उचलण्याचे धाडस ठेकेदार करतोस कसा, अशी चर्चा सुरू झाली आहे.साकरी येथून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या महामागार्साठी साकरी येथील गट क्रमांक २५४ मधील जिल्हा परिषदेच्या पाझर तलावातून गौण खनिज (गाळ) उचलण्याची परवानगी जिल्हाधिकाºयांनी दिली आहे. जिल्हाधिकाºयांनी केवळ सहा डंपरने १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली आहे. यात १० हजार ७३० ब्रास गौणखनिज उचलण्याचे नमूद केले आहे. ठेकेदाराने मात्र तब्बल २० ते २५ डंपर लावून हजारो ब्रास गौणखनिज उचलण्याचा सपाटा सुरू केला आहे. यासंदर्भात ठेकेदार जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची ऐशी तैशी करून गौणखनिज उचलत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी शनिवारी रात्री या डंपरला रात्रीची परवानगी आहे का, असा प्रश्न विचारून गौनखनिज उचलण्यासाठी मज्जाव केला. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. तहसीलदारांनी संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या गौणखनिज वाहतुकीस कुणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे, तर ठेकेदाराने महिनाभरात किती ब्रास गौणखनिज उचलले याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, हा पाझर तलाव जिल्हा परिषद मालकीचा आहे. जिल्हा परिषदेने या तलावातून गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले किंवा जिल्हा परिषदेने तसा ठरावही केला नसल्याचे समजते. जिल्हाधिकाºयांनी मात्र या तलावातून दोन महिन्यात २० हजार ब्रास गाळ उचलण्याची परवानगी दिली आहे तर ठेकेदाराने मात्र जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची ऐशी तैशी करून तब्बल वीस ते पंचवीस डंपर लाउन रात्रंदिवस २४ तास हजारो ब्रास गौणखनिज उतरण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या २८ रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित होणार असल्याचे समजते.समज दिली- तहसीलदार थोरातयासंदर्भात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला असता, शनिवारी रात्री काही डंपर गौणखनिज वाहत असल्याची तक्रार आली होती. या तक्रारीवरून संबंधित ठेकेदारास समज देण्यात आली आहे. कारवाई मात्र करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. हे गौणखनिज राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी नेण्यात येत असल्याचे तहसीलदार थोरात यांनी सांगितले.

टॅग्स :sandवाळूBhusawalभुसावळ