शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

या वर्षात STच्या ६५ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नवा गणवेश, महामंडळाने कापड खरेदीसाठी सुरू केली निविदा प्रक्रिया

By सचिन देव | Updated: March 22, 2023 17:52 IST

यासाठी कापड खरेदीची निविदा काढली असून, यामुळे राज्यातील ६५ हजार एसटी-कर्मचाऱ्यांना यंदा नवीन गणवेश मिळणार असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव: मागील पाच वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने चालक-वाहकांना दिलेल्या गणवेशाबाबत राज्यभरातून चालक-वाहकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्यानंतर, महामंडळाने हा ठेका रद्द करून, मुदतवाढ दिली नव्हती. त्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना पाच वर्षांत एकदाही गणवेश मिळाला नव्हता. मात्र, एसटी महामंडळाने आता कर्मचाऱ्यांना रेडिमेड गणवेश न देता, कापड देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कापड खरेदीची निविदा काढली असून, यामुळे राज्यातील ६५ हजार एसटी-कर्मचाऱ्यांना यंदा नवीन गणवेश मिळणार असल्याचे दिसून येत आहे.

पूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी कापड देऊन, शिलाई भत्ताही दिला जात होता. मात्र, २०२७ मध्ये ही प्रथा बंद करून, महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना रेडिमेड गणवेश देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी एका खासगी संस्थेशी करार करून, कर्मचाऱ्यांचे गणवेश शिवण्यात आले होते. मात्र, निकृष्ट दर्जाचे कापड व हा गणवेश अनेक कर्मचाऱ्यांना व्यवस्थित बसत नसल्यामुळे, राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी या गणवेशाबद्दल मोठ्या संख्येने महामंडळाकडे तक्रारी केल्या होत्या. यावर महामंडळाने ही पद्धत बंद केली होती. मात्र, त्यानंतर महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना गणवेशच दिले नसल्याने, कर्मचाऱ्यांमधून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत होता. गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने विविध मागण्या मान्य करताना, कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे गणवेश देण्याची पद्धतही मान्य केली होती. त्यामुळे महामंडळातर्फे पुन्हा आता पूर्वीप्रमाणे कर्मचाऱ्यांना कापड व शिलाई भत्ता देऊन गणवेश देण्यात येणार आहे.

तर २५० रुपयांमध्ये गणवेश कसा शिवणार.. -महामंडळाने पूर्वीप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना कापड व २५० रुपये शिलाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, वाढत्या महागाईनुसार एक गणवेश शिवण्यासाठी सध्या शिलाईचे दर ५०० रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे २५० रुपयांमध्ये गणवेश कसा शिवणार, असा प्रश्न कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात असून, शिलाई भत्ता वाढविण्याची मागणी कर्मचाऱ्यांमधून केली जात आहे.

एसटी महामंडळाने एसटीच्या चालक, वाहक व इतर कर्मचारी बांधवांना गणवेश देण्यासाठी कापड खरेदीची निविदा प्रक्रिया काढली आहे. कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी चांगल्या दर्जाचा कापड उपलब्ध करून दिला जाणार आहे. येत्या दोन ते अडीच महिन्यात कर्मचाऱ्यांना गणवेशाचे नवीन कापड उपलब्धकरून दिले जातील.शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ. 

टॅग्स :JalgaonजळगावState Governmentराज्य सरकार