शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेमंड चौफुलीवर रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून जबरी लुटणाऱ्या तिसऱ्या संशयितास अटक; चौथा फरारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 20:57 IST

जळगाव - जामनेर जाण्यासाठी निघालेल्या रिक्षा चालकाला कारमध्ये बसवून अज्ञात चार जणांनी रेमंड चौकात बेदम मारहाण करून खिश्यातील पैसे ...

जळगाव - जामनेर जाण्यासाठी निघालेल्या रिक्षा चालकाला कारमध्ये बसवून अज्ञात चार जणांनी रेमंड चौकात बेदम मारहाण करून खिश्यातील पैसे कढून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तिसऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर चौथा संशयित अद्याप फरार झाला आहे. ही घटना २१ ऑक्टोबर २०२० रोजी शहरातील रेमंड चौकात दुपारी घडली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल आहे. आता संशयित आरोपींची संख्या तीन झाली आहे.दीपक रतिलाल माळी (वय-२८, रा. पाळधी ता. धरणगाव) हे जळगाव ते पाळधी दरम्यान रिक्षा चालवतात. ते बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता जामनेरला जाण्यासाठी अजिंठा चौफुलीवर आले. रिक्षा लावल्यानंतर जामनेर जाण्यासाठी रोडवर उभे होते. त्यावेळी एक कार (एमएच-१८, डब्ल्यू- ४५८८) आली. त्यातील चालकाने जामनेर जाण्यासाठी विचारले, दीपक हे जामनेर जाण्यासाठी कारमध्ये बसले, पुढे रेमंड चौकात कार थांबवून कारच्या बाजूला बसलेले अज्ञात व्यक्तींनी दोन्ही हात पकडून खिशातील १२५० रुपये बळजबरीने हिसकावून जिवे मारण्याची धमकी दिली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर मारहाण करण्यास सुरुवात केली. अंगाची झाडाझडती घेतल्यानंतर कारच्या खाली उतरवून दिले.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी गुन्ह्यातील संशयित आरोपी वसीम खान अजमल खान (वय-३०) आणि सलीम खान उर्फ गुड्डू इब्राहिम खान (वय-३३) दोन्ही रा. रा. दुध डेअरीजवळ नशिराबाद यांना यापुर्वी अटक करण्यात आली होती. तिसरा संशयित आरोपी नदीम खान हुसेन खान (वय-३०) रा. शिवाजी नगर, उमर कॉलनी याला एमआयडीसी पोलीसांनी आज पहाटे राहत्या घरातून अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. चौथा संशयित आरोपी वसीम रजोद्दीन रा. ताज नगर नशिराबाद हा अद्याप फरार आहे. ही कारवाई उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, आनंद सिंग पाटील, अतुल वंजारी, इमरान सय्यद, सुधीर साळवे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव