शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे बहुप्रतीक्षेत असलेली तिसरी रेल्वेलाईन ५ डिसेंबरपासून कार्यान्वित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:55 IST

भुसावळ येथील बहुप्रतीक्षेत व चर्चेत असलेली तिसरी रेल्वे लाईन ज्यामुळे मध्य रेल्वेवर असलेला रहदारीचा ताण कमी होईल ही रेल्वेलाईन ५ डिसेंबरपासून कार्यान्वित होणर आहे.

ठळक मुद्देरहदारीचा ताण कमी होणारतिसरे रेल्वेलाईन परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेची सूचना

भुसावळ, जि.जळगाव : येथील बहुप्रतीक्षेत व चर्चेत असलेली तिसरी रेल्वे लाईन ज्यामुळे मध्य रेल्वेवर असलेला रहदारीचा ताण कमी होईल ही रेल्वेलाईन ५ डिसेंबरपासून कार्यान्वित होणर आहे. यासंबंधीचे आदेश उपमुख्य विद्युत अभियंता मध्य रेल्वे या विभागाकडून देण्यात आले आहेत.मध्य रेल्वेच्या सध्या फक्त दोन मुख्य रेल्वे लाईन कार्यान्वित आहेत त्यामुळे साहजिकच रहदारीचा रेल्वेचा प्रवासी गाड्यांचा खूप ताण त्या दोन रेललाईनवर पडतो त्यावर उपाययोजना म्हणून मध्य रेल्वेने वर्षभर आधी तिसºया रेल्वे लाईनचे काम हाती घेतले होते. जेणेकरून प्रवासी गाड्या-मालगाड्या यांची नियमित वेळ पाळता यावी आणि दोन रेल्वे लाईनवरील ताण कमी व्हावा याची उद्देशपूर्ती येत्या ५ डिसेंबरला होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. सदर रेल्वे लाईन कार्यान्वित करण्याचे आदेश उपमुख्य विद्युत अभियंता मध्य रेल्वे यांच्याकडून संबंधित विभागाला मिळाले आहेत. पहिल्या टप्प्यात भुसावळ ते भादली दरम्यान तिसरी रेल्वे लाईन कार्यान्वित होणार आहे. या रेल्वे लाईन दरम्यान सर्व प्रकारच्या चाचण्या होतील. जेणेकरुन पुढे तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये.संबंधित रेल्वेलाईन सुमारे २५ हजार होल्ट्स इतकी विद्युत भारित असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता तिसºया रेल्वे लाइन दरम्यान या परिसरात राहणाºया रहिवाशांना संबंधित विभागांना आवाहन करण्यात आले आहे की, ही रेल्वेलाईन नेहमीकरिता कार्यरत राहणार आहे. त्या परिसरात कोणीही अनुचित प्रकार करू नये. तसे केल्यास संबंधित व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल.निश्चितच तिसºया रेल्वे लाईनमुळे मध्य रेल्वेवरील रहदारीचा ताण कमी होईल व प्रवाशांना ताटकळत बसावे लागणार नाही, अशी आशा व्यक्त करण्यात ेयेत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ