शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिम कॉलनीतील महिलांचा दोन महिन्यात मनपावर तिसरा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:32 IST

खासगी कंपनीकडून पाणी देण्याचे दिले आश्वासन

जळगाव : पंधरा-पंधरा दिवस पाणी येत नसल्याने सुप्रिम कॉलनीतील शेकडो महिलांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणत, जर चार दिवसात या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर मुला-बाळांसह मनपात ठिय्या आंदोलनाचा इशारा या भागातील महिलांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, पाण्याचा प्रश्नासाठी या भागातील महिलांचा दोन महिन्यातील हा तीसरा मोर्चा असून, प्रशासनाकडून देखील तिनही वेळा एकच उत्तर देण्यात आले आहे.शहरातील सुप्रिम कॉलनी भागात पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत जात असून, या भागातील नागरिक हैराण झाले आहेत. मनपा प्रशासनाकडून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने या भागातील महिलांनी नगरसेवक गणेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी १२ वाजता मनपा आयुक्तांच्या दालनात मोर्चा आणला. तसेच काही महिला व नगरसेवक गणेश सोनवणे यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता डी.एस.खडके हे देखील उपस्थित होते. सुप्रिम कॉलनीतील महिलांनी मार्च महिन्यात दोनवेळा मनपात मोर्चे आणले होते. तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही इशारा दिला होता. मात्र, तेव्हाही प्रशासनाने केवळ आश्वासन दिले होते.कोणाही कडून पाणी घ्या, पण आम्हाला पाणी द्याआयुक्तांनी यावेळी एमआयडीसीकडून पाणी घेण्यात येणार असून, लवकरच या भागात पाणी पुरवठा नियमित करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, या भागातील महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत प्रत्येकवेळा मनपात मोर्चा आणल्यानंतर प्रशासनाकडून चार दिवसात पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले जाते. तर आमदार सुरेश भोळे देखील अनेक महिन्यांपासून केवळ आश्वासन देत असून, ते देखील जैन इरिगेशनकडून पाणी आणून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र, कोणाही कडून पाणी आणा, पण आम्हाला पाणी द्या अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांनी व्यक्त केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव