शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षाव्यवस्थेचाच चोरला ‘तिसरा डोळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 17:31 IST

उटखेडा येथील हायस्कूलमधील घटना, पाच चोरटे झाले कॅमेऱ्यामध्ये कैद

उटखेडा, ता.रावेर  :  येथील सरस्वती विद्या मंदिर हायस्कूलच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी अज्ञात पाच चोरट्यांविरूद्ध रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे .          आजवर पैशांची चोरी, गाड्यांची चोरी झाल्याचं ऐकलं आहे, तसेच एटीएम मशीन चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. पण आता सुरक्षाव्यवस्थेचा तिसरा डोळा ओळखला जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला गेल्याचे उघड झाले आहे . चोरणारी गँग ग्रामिण भागात सक्रिय झाली असून या टोळीने सीसीटीव्ही कॅमेरे उखडून न्यायला सुरुवात केली आहे.     चोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे किंवा अद्यावत  सुरक्षायंत्रणा लावून आपण कितीही काळजी घेतली तरी काही शहाणे चोर चोरी करून कधी पोबारा करतील याचा थांगपत्ताही आपल्याला लागायचा नाह . गत मार्च महिन्यापासून संपूर्ण जग कोरोनाच्या जागतिक महामारीने होरपळून निघालेले आहे . त्याला शिक्षणक्षेत्र देखील अपवाद नाही . मागील आठ महिन्यांपासून सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत . याचाच फायदा घेत उटखेडा येथील हायस्कूलमध्ये चोरीची घटना घडली आहे . हायस्कूलमधील तीन कॅमेरे चोरीला गेल्याचे उघडकीस आले . सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर कार्यालयामध्ये होता . या डिव्हीआरमधील फुटेज हायस्कूलच्या शिक्षकांनी तपासले असता त्यात पाच जण हायस्कूलमध्ये येत असल्याचे दिसून आले . या चोरट्यांनी कॅमेरे लंपास केले . या प्रकरणी हायस्कूलचे मुख्याध्यापक ललित चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात पाच चोरांच्या विरूद्ध गुन्हा नोदविण्यात आला .