शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

नंदुरबारचे ‘सिव्हिल’ राज्यात तृतीय

By admin | Updated: May 13, 2014 00:02 IST

रवींद्र मोराणकर, नंदुरबार- चांगल्या रुग्णसेवेबद्दल नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाने राज्य स्तरावर तृतीय स्थान मिळविले आहे.नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला ८० पैकी ६४ गुण मिळाले आहेत.

रवींद्र मोराणकर, नंदुरबार- चांगल्या रुग्णसेवेबद्दल नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाने राज्य स्तरावर तृतीय स्थान मिळविले आहे. बाह्यरुग्ण व आंतर रुग्णांना दिल्या जाणार्‍या विविध सेवांबाबतचे मूल्यांकन मुंबईस्थित आरोग्य सेवा संचालनालयातर्फे करण्यात आले. त्यात नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला ८० पैकी ६४ गुण मिळाले आहेत. राज्य शासनाच्या अखत्यारित रुग्णांना दिल्या जाणार्‍या आरोग्य सेवांचे दरवर्षी मूल्यांकन करण्यात येते. ज्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये जोडलेली नाहीत अशी राज्यात २७ जिल्हा सामान्य रुग्णालये आहेत. या रुग्णालयांचे आरोग्य सेवा संचालकांतर्फे मूल्यांकन करण्यात आले. या तपासणीत बेडचा वापर, दररोज तपासण्यात येणारे सरासरी बाह्यरुग्ण, डायलिसीस, शवविच्छेदन, दंतरोग तपासणी, अपघातग्रस्त रुग्णांना मिळालेली सेवा, बाळंतपण, शस्त्रक्रिया इत्यादींचा वर्षभराचा आढावा घेण्यात आला. या मूल्यांकनाच्या आधारे भंडारा जिल्हा रुग्णालयाने (६९ गुण) प्रथम, तर अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाने (६५ गुण) द्वितीय स्थान पटकावले. सातारा, गडचिरोली व नंदुरबार या तीन जिल्हा रुग्णालयांना प्रत्येकी ६४ गुण मिळाले आहेत. यामुळे ही तिन्ही रुग्णालये संयुक्तरीत्या तिसर्‍या स्थानावर राहिली. जळगाव जिल्हा रुग्णालयाला ५५ गुण मिळाले असून, ते सतराव्या स्थानावर राहिले आहे. धुळे जिल्हा रुग्णालयाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जोडल्याने त्यांचा विचार या मूल्यांकनात करण्यात आलेला नाही. जिल्हा रुग्णालयातील सर्व सहकारी डॉक्टर्स, परिचारिका यांच्यासह सर्व कर्मचार्‍यांच्या योगदानामुळे नंदुरबार जिल्हा रुग्णालय राज्यात तिसर्‍या स्थानावर राहिले. गेल्या वर्षी आम्ही दहाव्या स्थानावर होतो. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत रुग्ण सेवेच्या बाबतीत नक्कीच प्रगती होत आहे. -डॉ.हेमंतकुमार बोरसे, जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार पहिली १० रुग्णालये जिल्हा गुण भंडारा ६९ अहमदनगर ६५ सातारा ६४ गडचिरोली ६४ नंदुरबार ६४ खामगाव ६२ वर्धा ६२ जालना ६१ पुणे ६० परभणी ५९