शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

कापूसकोंडय़ाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2017 11:01 IST

‘कापूसकोंडय़ाची गोष्ट’ किती जणांना आठवतेय? ािस्तपूर्व काळ या धर्तीवर बोलायचं तर ‘इंटरनेट’पूर्व काळातली ती गोष्ट आहे. तो एक प्रकारचा खेळ होता.

 ‘कापूसकोंडय़ाची गोष्ट’ किती जणांना आठवतेय? ािस्तपूर्व काळ या धर्तीवर बोलायचं तर ‘इंटरनेट’पूर्व काळातली ती गोष्ट आहे. तो एक प्रकारचा खेळ होता. एखाद्याला विचारायचं, ‘‘तुला कापूसकोंडय़ाची गोष्ट सांगू?’’ आणि मग त्यावर तो काहीही बोलला किंवा न बोलला, तरी परत परत तेच विचारायचं, ‘‘कापूसकोंडय़ाची गोष्ट सांगू?’’ ऐकणारा पार ‘किर्र’ होईर्पयत असं विचारतच रहायचं.. प्रत्यक्ष गोष्टीला सुरुवात कधी होतच नाही! कारण अशी कोणतीही ‘गोष्ट’ प्रत्यक्षात कधी नसतेच. समोरच्याचं डोकं फिरवण्यासाठी ते नाव फक्त पुन्हा पुन्हा घेतात. थोडक्यात काय, तर काहीही विचार नसलेली, मुद्दा नसलेली किंबहुना ‘गोष्ट’सुद्धा नसलेली अखंड वटवट म्हणजे कापूसकोंडय़ाची गोष्ट.

मला लहानपणी फार कुतूहल होतं, की हा कापूस कोंडय़ा नक्की कुठे असतो? त्याची गोष्ट नक्की कशाबद्दल आहे? वगैरे वगैरे.. मोठेपणी, अलीकडेच हे कोडं उलगडलं. कापूसकोंडय़ा दिसला कधीच नाही, पण त्याचा वावर कुठे असतो ते मात्र समजलं. चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेलच.. पण जाऊ द्या, उगाच डोक्याला ताण नको. मीच सांगून टाकतो. 24 तास बातम्यांचा रतीब अदृश्य रूपाने वावरत असतो. कारण  त्याचीच गोष्ट सांगायला सगळे चर्चावीर एकत्र जमलेले असतात. मोठमोठय़ाने, तावातावाने, घशाच्या शिरा ताणून ते सूत्रसंचालकाला, एकमेकांना आणि प्रेक्षकांना या कापूसकोंडय़ाची गोष्ट तर सांगत असतात. आठवून बघा. कितीही तास चर्चा- महाचर्चा चालली चालली तरी ती (एकदाची) संपल्यानंतर फक्त अध्र्या तासाने आपण प्रेक्षकांनी आठवण्याचा प्रय} केला की, थोडय़ा वेळापूर्वी आपण काय ऐकलं? तर काही म्हणता काही लक्षात रहात नाही. फक्त कुणीतरी चष्मीष्ट बुवा किंवा बाई, ‘‘मला.. मला.. मला.. मला. असं म्हणायचंय-’’ असं तार सप्तकात बोलताहेत, आणि त्याचवेळी इतर सर्व भिडू प्रचंड गदारोळ करून आपापलं सप्तक लावताहेत, एवढंच लक्षात रहातं. जो-तो आपापल्या परीने आपापली कापूसकोंडय़ाची गोष्ट सांगत असतो.
गोष्टीला विषय कोणताही- अक्षरश: कोणताही चालतो. कोणीतरी लहान मुलगा खेळताना बोअर-वेलच्या खड्डय़ात पडला.. कोणत्याही सुमार नटीचा झगा एखाद्या फिल्मी पार्टीत टरकला.. कोणातरी अति श्रीमंत, लाडावलेल्या कार्टीने तुफान दारू पिऊन तुफान वेगाने गाडी चालवून धडकावली.. एखाद्या ‘बोल्ड’ वगैरे नटीने अंगावरल्या कपडय़ांबद्दल असलेल्या आपल्या अॅलर्जीची लागण इतरांना केली.. एखाद्या (इंग्रजीत लिहिणा:या) देशी लेखिकेने हलाहल पचवणा:या शंकराच्या आवेशात ‘मी आता बीफ खाणार आहे’ म्हणून घोषणा केली.. इथपासून ते थेट- अमेरिकेच्या लोकांनी हिलरीबाईंच्या ऐवजी ट्रंप साहेबाला निवडून दिलं.. ओबामाने पाकिस्तानला न विचारता, ओसामा बिन लादेनला मारलं.. कोणत्यातरी जागतिक विचारवंताने आपण ‘गे’ असल्याची घोषणा केली.. इथर्पयत, कोणताही विषय असला, तरी चालतोय की! बघता बघता मिठाईवर माशा जमाव्यात, तसे नेहमीचे यशस्वी चर्चावीर वाहिन्यांवर जमा होतात. आणि ‘एक, दोन..साडे-माडे तीन!’ म्हटलं की, कापूस कोंडय़ाची गोष्ट सुरू होते. ज्या फालतू विषयांवरच्या चर्चेने समाजाचा काडीचाही फायदा होणार नाहीये, आणि ज्या विषयांवरची यांची बडबड संबंधितांर्पयत आयुष्यात कधी पोहोचणार नाहीये, अशा विषयांवर चाललेलं चर्चेचं गु:हाळ किती चालवावं, याला काही सुमार?
या कापूसकोंडय़ाचा कापूस नीट पिंजला जातोय की नाही, याकडे सूत्रसंचालक जातीने लक्ष ठेवून असतात. कोणीही कोणालाही पूर्ण बोलू देणार नाही, आणि कोणीही कोणाचंही म्हणणं नीट ऐकून घेणार नाही, याची संपूर्ण खबरदारी चर्चेच्या दरम्यान घेतली जाते. सगळ्यात जास्त आरडा-ओरडा करणा:या आणि सगळ्यात बेअकली विधानं करणा:या भिडूला अगदी आवजरून निमंत्रण असतं! सवाल टी.आर.पी.का है भाई! आताचंच बघा ना- राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर झालाय. आता वाहिन्या- वाहिन्यांवर कापूसकोंडय़ाच्या गोष्टी सुरू होतील. घनघोर चर्चा होतील. ‘कुठेही जाऊ नका.. आम्ही लगेच परत येतोय,’ असा गोड दम दिला जाईल.. एन्जॉय!-ते जाऊ द्या.. कापूसकोंडय़ाची गोष्ट सांगू?
-अॅड.सुशील अत्रे