शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

चोरट्यांनी तब्बल ९ दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 22:01 IST

हाती रोकड न लागल्याने केकच्या दुकानातील गल्ल्यात ठेवले १० रुपये

जळगाव : गणेश कॉलनी परिसरात मध्यरात्री चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला असून युनिटी चेंबर्समध्ये एका पाठोपाठ ९ दुकाने फोडली. त्यात कुठेच रोकड हाती न लागल्याने चोरट्यांनी संतापात स्वत:केकच्या दुकानात दहा रुपये ठेवल्याचा उघड झाले आहे. दरम्यान, दहा दिवसापूर्वी देखील याच चेंबर्समध्ये दोन दुकाने चोरट्यांनी फोडली होती.युनीटी चेंबर्समध्ये मेजर कॉर्नर या बिल्डींगमध्ये काही दुकानांमध्ये कार्यालय तर काही दुकानांमध्ये फोटोग्राफरचे दुकान आहे. शेजारी मोबाईल कंपनी व इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान त्याच्या बाजूला हरिविठ्ठल नगरातील रहिवासी दीपक राठोड याचे कार्यालय तसेच त्याच्या बाजूला पोलीस कर्मचारी मिलिंद केदार यांचे कार्यालय असून तेथे फर्निचरचे काम सुरु आहे. केदार यांच्या बाजूला पिंप्राळा परिसरातील शाम कासार यांचे मयुरी फोटो स्टुडिओ आहे. शेजारील दुकानाचे दोन्ही बाजूचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र याठिकाणी केवळ कागदपत्रे होती. इतर दुकानांमध्ये चोरट्यांनी शटर वाकवून तसेच कुलुप तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रयत्न असफल ठरला.वकीलाच्या कार्यालयातील सीसीटीव्हीवर टाकला कापडयुनीट चेंबरपासून काही अंतरावर अ‍ॅड. ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांचे कार्यालय, त्याच्या शेजारीत मणिगुरु इन्व्हेसमेंट, कृती कन्ट्रक्शन यांचेही कार्यालय आहे. या तीन्ही कार्यालयाचे शटर वाकवून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. या कार्यालयामध्ये केवळ कागदपत्रेच चोरट्यांच्या हाती लागली. यात अ‍ॅड. सुर्यवंशी याच्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चोरट्यांनी कापड टाकला. याच कार्यालयांशेजारी मुकेश के.पाटील यांच्या शिवराया मल्टीसर्व्हिसेसमचे कुलुपही तुटले नाही व शटरही न वाकल्याने प्रयत्नही असफल ठरला.दहा रुपये ठेवले, मात्र केकला स्पर्श नाहीयुनीटी चेंबरमधील दुकाने, कार्यालयानंतरही चोरट्यांनी ख्वॉजामियाच्या दर्ग्याच्या विरुध्द बाजूने रस्त्यालगतचे सुनील सदानंद किझुमविल यांच्या मालकीचे भाडेकरारावर बडीज केक शॉप लक्ष्य केले. दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. या ठिकाणीही गल्लयात चोरट्यांना रोकड हाती लागली नाही. नऊ दुकानांमध्ये प्रयत्न करुनही कुठलीही रक्कम हाती न लागल्याच्या संतापात चोरट्यांनी या केकच्या दुकानातील रिकाम्या गल्ल्यात स्वत: हून दहा रुपये टाकून पोबारा केला. दुकानात काचेच्या कपाटांमध्ये केकही होते, मात्र चोरट्यांनी केकसह कुठल्याही वस्तूला हात लावला नसल्याचेही समोर आले आहे.११ रोजी फोडले होते दोन दुकान११ नोव्हेंबर रोजी युनिटी चेंबर्समध्ये साईराज पानटपरी, हेरंब इंटरप्रायझेस ही दोन दुकाने फोडून तिसºया दुकानात प्रयत्न झाल्याची घटना घडली होती. दहा दिवस उलटत नाही तोच चोरट्यांनी याच परिसरात बुधवारी मध्यरात्री धुमाकूळ घालत ९ दुकानांना लक्ष्य केले. दरम्यान दहा दिवसातील चोरीच्या प्रयत्नाच्या १२ घटना घडल्याने दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान, याप्रकरणी एकाही दुकानदाराने पोलिसात तक्रार केली नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव