शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जळगावात प्रसुत झालेल्या सूनेच्या उपचाराच्या पैशावर चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 19:31 IST

प्रसुत झालेल्या सुनेचे दवाखान्याचे बील भरण्यासाठी ठेवलेले २० हजार व अकरा ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना पिंप्राळा भागातील त्रिमुर्ती नगरात बुधवारी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे घरमालक रवींद्र सुकलाल बारी हे कुटुंबियांसह घरात झोपलेले असतांना ही चोरी झालेली आहे.

ठळक मुद्देपिंप्राळ्यात घरफोडी कुटुंब घरात झोपले असताना झाली चोरीपोलिसांनी घेतले घटनास्थळाचे ठसे

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, १५ : प्रसुत झालेल्या सुनेचे दवाखान्याचे बील भरण्यासाठी ठेवलेले २० हजार व अकरा ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना पिंप्राळा भागातील त्रिमुर्ती नगरात बुधवारी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे घरमालक रवींद्र सुकलाल बारी हे कुटुंबियांसह घरात झोपलेले असतांना ही चोरी झालेली आहे.पिंप्राळा परिसरातील त्रिमुर्ती नगरात रवींद्र सुकलाल बारी हे कुटूंबियांसोबत वास्तव्यास आले.  त्यांचा टेन्ट हाऊस फुलांचा व्यावसाय आहे.मोठा मुलगा दिनेश हा विवाहित असून सुन ममता यांची खासगी दवान्यात प्रसुती झाली असल्याने त्या दवाखान्यात आहेत.दवाखान्याचे बील भरण्यासाठी त्यांनी २० हजार रुपये जमविले होते तर ११ ग्रॅम सोने हे पुर्वीचेच होते. याच मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

विळ्याने कापले कपाट मंगळवारी पत्नी दवाखान्यात असल्याने दिनेश रात्रभर घरी नव्हते, तर रवींद्र बारी, त्यांच्या पत्नी लिलाबाई व लहान मुले घरात झोपलेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. यानंतर घरात संपूर्ण खोलींची पाहणी करुन आतील खोलीतील कपाट पलंगाच्या अंथरूणाखाली ठेवलेल्या विळ्याच्या सहायाने कापून कपाट फोडले व त्यातील २० हजार रूपयांची रक्कम तसेच खुंटीला टांगेलेल्या पॅँटच्या खिशात ठेवलेले ११  ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र घेऊन चोरट्यांनी पोबरा केला. पहाटे साडे चार वाजता बारी हे लघु शंकेसाठी उठले असता त्यांना घराची मागील दरवाजा उघडा व कपाट फुटलेले दिसले.