शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी लांबविलेला ट्रक सापडला ‘जीपीएस’ यंत्रणेद्वारे सहा तासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 22:44 IST

अजिंठा चौक परिसरातून चोरी गेलेल्या ट्रकचा शोध ‘जीपीएस’ या तंत्रज्ञानामुळे अवघ्या सहा तासात सापडला, मात्र चोरट्याला कुणकुण लागताच नांदूरा शहराजवळ ट्रक सोडून चोरट्याने पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द शनिवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमालकाने केला पाठलाग  नांदूराजवळ ट्रक सोडून चोरट्याचे पलायन मध्यरात्री लांबविला ट्रक

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१०:  अजिंठा चौक परिसरातून चोरी गेलेल्या ट्रकचा शोध ‘जीपीएस’ या तंत्रज्ञानामुळे अवघ्या सहा तासात सापडला, मात्र चोरट्याला कुणकुण लागताच नांदूरा शहराजवळ ट्रक सोडून चोरट्याने पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द शनिवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अब्दुल रज्जाक अब्दुल मज्जीद सालार (रा.शनी पेठ, जळगाव) यांचा इदगाह कॉम्प्लेक्ससमोर एमको या नावाने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तेथे समोरच मोकळ्या जागेत तीन ट्रक लावलेले असतात, त्यापैकी चालक बशीरोद्दीन अब्दुल सत्तार (रा.बळीराम पेठ, जळगाव) या चालकाने ६ मार्च रोजी रात्री साडे आठ वाजता क्र.एम.एच.१९ झेड.२६९२ हा ट्रक देखील त्या ठिकाणी लावण्यात आलेला होता. वॉचमन रशिद मोहम्मद तडवी याला ट्रकवर लक्ष ठेवण्याचे सांगून अब्दुल रज्जाक सालार व त्यांचा मुलगा शेख फारुख सालार हे दोन्ही जण घरी निघून गेले.मध्यरात्री लांबविला ट्रकमध्यरात्री अडीच वाजता ट्रक सुरु करुन कोणीतरी घेऊन जात असल्याचे लक्षात आल्यानंतर वॉचमनने मालकाला घटनेची माहिती दिली. ट्रकमध्ये जीपीएस प्रणाली बसवून त्याचे कनेक्शन फारुख सालार यांनी मोबाईलमध्ये घेतलेले असल्याने त्यांनी तत्काळ ही प्रणाली सुरु केली. त्यावेळी ट्रक महामार्ग सहाच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. ट्रकचा केला पाठलागफारुख सालार व अन्य सहका-यांनी कारद्वारे या ट्रकचा पाठलाग केला. जीपीएस प्रणाली ट्रकचे लोकेशन दाखवित असल्याने पाठलाग करणे सोपे झाले होते. या ट्रकला नांदूरा (जि.बुलडाणा) येथे कारने ओव्हरटेक केला. चालकास ट्रक थांबविण्याचा इशारा केला असता त्याने ट्रक थांबविला, मात्र पकडले जाण्याच्या भीतीने त्याने ट्रक सोडून शेतातून पळ काढला. यावेळी सालार यांनी नांदूरा येथून ट्रक जळगाव शहरात आणला. त्यानंतर शनिवारी चोरट्याविरुध्द तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.