शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे दुकानातून मोबाईल चोरी करणारा चोरटा सीसीटीव्हीमुळे सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 17:20 IST

दुकान मालक व ग्राहकाचे लक्ष विचलित करुन दुकानातून मोबाईल लांबवितांना सीसीटीव्ही कॅमेºयात कैद  झालेल्या सौरभ नंदकिशोर गावंडे (वय १९ रा.खेडी, ता.जळगाव) याला शहर पोलिसांनी सहा तासातच जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. गावंडे याच्यासोबत आणखी दोन अल्पवयीन मुले असल्याचा संशय असून या मुलांनाही पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते.

ठळक मुद्देसहा तासातच केली अटक  चार मोबाईल हस्तगतदोन दिवसाची पोलीस कोठडी

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६ : दुकान मालक व ग्राहकाचे लक्ष विचलित करुन दुकानातून मोबाईल लांबवितांना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद  झालेल्या सौरभ नंदकिशोर गावंडे (वय १९ रा.खेडी, ता.जळगाव) याला शहर पोलिसांनी सहा तासातच जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. गावंडे याच्यासोबत आणखी दोन अल्पवयीन मुले असल्याचा संशय असून या मुलांनाही पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते.

अमित अशोक तुलसानी (रा.सिंधी कॉलनी, जळगाव) यांचे गोलाणी मार्केटमध्ये रिध्दी सिध्दी नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. या दुकानातून शनिवारी दुपारी तीन ते साडे तीन या कालावधीत सात हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. अमित तुलसानी यांनी याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्यानुसार सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक जण मोबाईल चोरताना स्पष्ट दिसत होता तर त्याच्या शेजार दोन जण दिसत होते. 

या फुटेजचा आधार घेऊन तपासी अमलदार दीपक सोनवणे, संजय भालेराव, मोहसीन बिराजदार, प्रणेश ठाकुर, अक्रम शेख व सुधीर साळवे यांनी संशयिताचा शोध घेतला असता रात्री साडे नऊ वाजता गावंडे हा गोलाणीत फिरताना आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरीचा मोबाईल व आणखी तीन असे चार मोबाईल आढळून आले. दरम्यान, या चोरट्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता न्या.व्ही.एच.खेळकर यांनी त्याला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.