शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

क्षणात होत्याचे नव्हते झाले, मालगाडीच्या टपावर चढलेल्या तरूणाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:18 IST

मित्रांसोबत आला होता लघुशंकेसाठी

जळगाव : नवीन बजरंग बोगद्यावर उभ्या असलेल्या इंधन वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या टपावर चढलेल्या तरूणाचा उच्चदाबाच्या वीजवाहक तारेला स्पर्श होवून मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़ योगेश गुलाब मराठे (२०, रा़ खोटेनगर परिसर, जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे़ योगेश हा दोन मित्रांसोबत लघुशंकेसाठी रेल्वे रूळाजवळ आला असता तेव्हा ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले़योगेश हा खोटेनगर परिसर आई-वडीलांसह वास्तव्यास होता़ सोमवारी रात्री योगेश हा मित्र विशाल यादव आणि नीलेश घाटे यांच्यासोबत घराबाहेर दुचाकीने फिरण्यासाठी आला होता़ रात्री ८ वाजेच्या सुमारास तिघेही पिंप्राळा रस्त्यावरील बजरंग बोगद्याजवळील रेल्वे रूळाजवळ लघुशंकेसाठी आले होते. त्यावेळी इंधन वाहून नेणारी मालगाडी उभी होती़ योगेश हा मालगाडी ओलांडून दुसºया दिशेने गेला़ त्यानंतर तो मालगाडीवर चढला असता त्याचा अचानक तोल गेला आणि रेल्वेच्या उच्चदाबाच्या तारेला त्याचा स्पर्श झाला़ अन् काही क्षणातचं मोठा आवाज होवून योगेश गतप्राण झाला.मित्रांनी घेतली धावस्फोटासारखा आवाज झाला़ त्यामुळे विशाल आणि नीलेश या दोघांनी मालगाडीच्या दिशेने धाव घेतली़ तर दोघांना योगेश हा संपूर्ण भाजलेला मृत अवस्थेत दिसून आला़ मित्राला मृत पाहून त्यांनी त्वरित पुलाच्या खाली धाव घेतली आणि नागरिकांना घटनेची माहिती दिली़

टॅग्स :Jalgaonजळगाव