शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

गाळेधारकांच्या प्रश्नावर तोडगा नाही अन् कारवाई ही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न अजूनही सुटत नसून, हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीच्या होत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न अजूनही सुटत नसून, हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीच्या होत जात असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. गाळेधारकांच्या प्रश्नावर प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी कोणताही तोडगा काढण्यास तयार नाही. दुसरीकडे गाळेधारकांचे बेमुदत संप सुरूच असून, मनपा प्रशासनाने गाळेधारकांना थकीत भाडे भरण्यासाठी दिलेला दोन दिवसांचा अल्टिमेटमही आता संपला आहे. याबाबत महापालिका कारवाईही करत नाही आणि दुसरीकडे गाळेधारकांच्या संपाबाबत गाळेधारकांशी कोणतीही चर्चा करत नसल्याने हा प्रश्‍न अधिकच गंभीर होत जात आहे.

महापालिकेच्या मुदत संपलेला मार्केटमधील गाळेधारकांची प्रश्न हा गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही महापालिकेच्या बाजूने निर्णय देत गाळे ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनही कोणतीही कारवाई करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे दिसून येत नाही, तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाने गाळेधारकांना थकीत भाड्यापोटी दिलेली बिले ही अवाजवी असल्याने, गाळेधारक बिलांची रक्कम भरण्यास तयार नाही. त्यातून मधला मार्ग काढण्याबाबत मागचे सत्ताधारी किंवा विद्यमान सत्ताधारी हेही कोणतेही प्रयत्न करत नसल्याचेच दिसून येत आहे. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गाळेधारकांना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ही बैठकही अद्यापपर्यंत होऊ शकलेले नाही. गाळेधारकांना प्रश्न प्रलंबित होत असल्याने, महापालिकेचा आर्थिक परिस्थितीवरही मोठा परिणाम होत आहे, तर दुसरीकडे गाळेधारकांच्या जीवही भांड्यात पडला आहे.

मनपाकडून केवळ अल्टिमेटमच

महापालिका प्रशासनाने गाळेधारकांनी नुकसान भरपाईची रक्कम भरण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या, तसेच ही रक्कम लवकर भरण्याच्या सूचना देऊन, रक्कम न भरल्यास गाळे ताब्यात घेण्याबाबतचे आदेशही महापालिका प्रशासनाने दिले होते. महापालिका प्रशासनाकडून आतापर्यंत गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम मिळण्याबाबत अनेक वेळा अल्टिमेटम दिले आहेत. मात्र, महापालिकेलाही कोणतीही ठोस कारवाई करता आलेली नाही. महापालिका आयुक्त महापालिकेची आर्थिक परिस्थिती गाळे प्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत सुधारणार नाही, असे सांगतात. मात्र, ही रक्कम वसुलीबाबत कोणतीही कारवाई करायला महापालिका प्रशासन धजावत नसल्याचे दिसून येत आहे.

गाळेधारकांनी स्वतः सुरू केली आता लढाई

महापालिकेच्या मुदत संपल्या मार्केटमधील गाळेधारकांनी हा प्रश्न कायमसाठी सुटावा, यासाठी लोकप्रतिनिधींकडे अनेक वेळा आपले प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधींकडून हा प्रश्न सुटताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे, हा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीही फारसे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाहीत. गाळेधारकांच्या प्रश्न हा लोकप्रतिनिधींसाठी राजकीय मुद्दा झाला असून, हा प्रश्न प्रलंबित ठेवण्यातच राजकीय पदाधिकारी उत्सुक असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे आता गाळेधारकांनी आपली लढाई आता स्वतः सुरू केली असून, गेल्या दहा दिवसांपासून शहराचे १६ मार्केटमधील गाळेधारकांनी बेमुदत संप पुकारला आहे. विशेष म्हणजे, या संपाकडे कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने लक्ष दिलेले नाही, तसेच महापालिका प्रशासनही या संपाकडे लक्ष देत नाही, तसेच कारवाईही करत नाही. यामुळे हा प्रश्न प्रलंबितच राहण्याची शक्यता आहे.