७ जूननंतर म्हणजे मृग नक्षत्रात पेरणी झाली तर हंगाम चांगला येतो, असा सर्वसामान्य समज आहे. मृग नक्षत्रात वाहन गाढव असल्याने गाढव हे वाहन पाऊस काही घेऊन आला नाही. दि. २१ जूनपासून आर्द्रा नक्षत्र सुरू होत आहे. याचे वाहनदेखील कोल्हा असल्याने आर्द्रा नक्षत्रातदेखील पाऊस मनासारखा म्हणजे पेरणी लायक पडणार का, ही चिंता सतावत आहे. या परिसरात खरिपाची शून्य टक्के पेरणी आहे. ज्यांच्याकडे विहिरीत थोडेफार पाणी होते, त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे कापूस लागवड केली आहे. पण आता विहिरीतील पाणी पातळी खालावल्याने हे नुकतेच उगवलेले कापसाचे कोंबदेखील कोमेजू लागले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात भयंकर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा महिनाभर उशिराने खरीप हंगामाची सुरुवात होणार आहे. पुढे पावसाळा कसा राहील याचा भरोसा नसल्याने या परिसरात मोठी भीती व्यक्त होत आहे.