जामनेर : तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने केले असले तरी अजूनही फत्तेपूर परिसरातील शेतकरी पंचनामे झाले नसल्याची तक्रार करीत आहे. तलाठी व कृषी विभागाकडे वारंवार विनंती करूनही नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने आमदार गिरीश महाजन यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. मदत मिळेल अथवा नाही याची शाश्वती नाही, मात्र पंचनामे होत नाही ही लाजीरवाणी बाब असल्याचे संतप्त शेतकरी बोलत आहे.सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने मका, कापूस, सोयाबीन व इतर कडध्यान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. महसूल व कृषी विभागाने सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे केले.पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार नोंदविली आहे. मात्र अद्याप काहीही कार्यवाही होत नसल्याचे शेतकरी सांगतात. शेतकºयांनी महागडे बियाणे घेऊन पेरणी केली, उत्पादन हाती येण्याची वेळ आली असत निसर्गाच्या अवकृपेने तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.पाच एकरमध्ये मका लावला आतापर्यंत सुमारे ७० हजार खर्च आला. अतिवृष्टीने मक्याचे पीक आडवे झाले. आता फक्त १० टक्के उत्पादन निघेल अशी स्थिती आहे. शेतकºयांच्या या प्रश्नाकडे आमदार गिरीश महाजन यांनी लक्ष घालून प्रशासनास पंचनामे करून मदत मिळवून द्यावी एवढीच अपेक्षा आहे.- पंकज चोपडे, शेतकरी, फत्तेपूरतालुक्यातील नुकसानग्रस्त शेतातील पिकांचे पंचनामे केले आहे. तरीही राहीलेल्या शेककºयांचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित भागातील कृषी सहायकांना दिले जातील.-अभिमन्यू चोपडे, तालुका कृषी अधिकारी, जामनेरअजूनही ३ टक्के भागातील शेतकºयांंचे पंचनामे झालेले नाही. फत्तेपूर मंडळ अधिकाºयांना पंचनाम्याचे आदेश दिले आहे. ज्या शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नसतील त्यांनी स्थानिक तलाठ्यांशी संपर्क साधावा.- अरुण शेवाळे, तहसीलदार
फत्तेपूर परिसरात नुकसानीचे पंचनामेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 23:18 IST
अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने केले असले तरी अजूनही फत्तेपूर परिसरातील शेतकरी पंचनामे झाले नसल्याची तक्रार करीत आहे.
फत्तेपूर परिसरात नुकसानीचे पंचनामेच नाही
ठळक मुद्देशेतकरी त्रस्त आमदार महाजन यांनी लक्ष देण्याची मागणी