शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

घरच नाही, आकाशकंदील बांधायाचा कुठे ?, मेंढपाळ कुटुंबाची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:51 PM

25 वषार्पासून पोटासाठी पायपीट

ठळक मुद्दे मुलांची शाळाही सुटली आकाशाचे छत, भुईचे अंगण मराठवाडा आणि खान्देशात भटकंती

जिजाबराव वाघ / ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 19 - ‘साक्री तालुक्यातील भागापूर हे आमचं गाव. 25 वर्षांपूर्वी मेंढरांच्या मागे निघालो आणि गाव सोडलं. तेव्हापासून वाट नेईल तिकडे पायपीट करतोयं आम्ही. त्यामुळं गाव सोडल,  पाठोपाठ दिवाळी ही सुटली..’  50 वर्षीय साळू बाळू गोरे या मेंढपाळाने अंधारात बुडालेल्या आपल्या दिवाळीची अशी कहाणी सांगितली. पंधरा दिवसांपूर्वी चाळीसगाव शहरातील करगाव रस्त्यालगत तीन मेंढपाळ कुटुंबांनी काही दिवसांसाठी आपले वास्तव्य केले आहेत. 

मराठवाडा आणि खान्देशात भटकंतीसाळू बाळू गोरे, महादू गोरे, हिरामण महादू गोरे ही मध्यम वयाची तीन भावंड. मेंढी आणि शेळीपालनचा पारंपारिक व्यवसाय ते करतात. मेंढय़ांना चारण्यासाठी 25 वर्षापूर्वी त्यांनी आपली बि-हाडं पाठीवर घेत गाव सोडलं. तेव्हापासून त्यांनी घराचा उंबरा पाहिला नाही. ‘जिथे आसारा मिळेल, तेच आमच गाव.’ असं ते हसून सांगतात. मराठवाडा, खान्देशात त्यांनी ही 25 वर्ष घालवली आहेत. एखाद्या गावात काही वर्ष किंवा काही दिवस ते मुक्काम करतात. 

आकाशाचे छत, भुईचे अंगण भटकंती करीत असल्याने सण - उत्सवांचं त्यांना फारसं अप्रुप नाही. आकाशाचं छत आणि भुईचे अंगण दिवाळीचा आकाश कंदील कोणत्या उंब-याला बांधायचा.? असा साधा प्रश्न ते विचारतात. आकाशातल्या चांदण्या हेच आमचे आकाश कंदील. अस ते सहज बोलून जातात. वार्षिक कॅलेंडर त्यांना माहित नाही. त्यांच्याकडे एकूण 300 मेंढय़ा - शेळ्या असून लेंडीखत, मेंढय़ा विकून त्यांची गुजराण होते. एका बैलगाडीत मावेल एवढ्याच काय तो  संसार. सणवाराचं कौतुक करणं आम्हाला परवडत नाही. चुलीवरची ऊन ऊन भाकर हेच आमचं जेवण आणि दिवाळीचं फराळही.. असं या तिघांच्या कारभारणीनं आनंदान सांगतात. मुलांची शाळाही सुटली मेंढपाळ असणा-या तिघा भावंडांना एकुण सहा मुलं आहेत. कुटुंबाच्या फिरस्तीमुळे त्यांनी शाळेचं तोंडही पाहिलेले नाही. यातील सर्वात मोठा हिरामण हा 12 वषार्चा असून उर्वरीत पाचही दहा वर्षाच्या आतील आहेत. मुलं म्हणतात आम्हालाही फटाके फोडावे वाटतात. पण मिळत नाही..  साळू गोरे यांची एक मुलगी मात्र एस.टी. महामंडळाच्या साक्री आगारात वाहक म्हणून नुकतीच रुजू झाली आहे. आश्रमशाळेत शिकून ती 12 वी उत्तीर्ण झाली आहे. 

प्रत्येक दिवस आमच्यासाठी सारखाच असतो. इच्छा असूनही सण साजरे करणे शक्य होत नाही. रोजच्या जगण्यासाठीच उधार-उसनवारी करावी लागते. गेल्या 25 ते 30 वषार्पासून पोटासाठी पायपीट करतोयं. त्यामुळे दिवाळी  साजरी केलेली नाही.- साळू बाळू गोरे, मेंढपाळ