शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीच्या बियाणांबाबत शासनाकडून सूचनाच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 21:32 IST

कृषी विभाग अनभिज्ञ

ठळक मुद्दे इतर बियाणांबाबत गुरूवारी सूचना प्राप्त ६४३० क्विंटलचे आवंटन

जळगाव : जिल्ह्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र असलेल्या कपाशीच्या बियाणांबाबत कृषी विभागाला शासनाकडून अद्याप काहीच सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. इतकेच नव्हे तर बीटीच्या पूर्वी बंदी घातलेल्या बियाणांवर यावर्षीही बंदी आहे की नाही? याबाबत देखील कृषी विभाग अनभिज्ञ आहे. दरम्यान गुरूवार, २६ रोजी इतर पिकांच्या बियाणांबाबतची सूचना कृषी विभागाला प्राप्त झाली.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्णात ८ लाख ३४ हजार ४५०हेक्टर क्षेत्र इतका पेरणी लक्षांक ठेवण्यात आला आहे. यामध्ये तृणधान्य १९०५२० हेक्टर, कडधान्य ११३५२० हेक्टर, गळीतधान्य ३५८६० हेक्टर, कापूस ४८३००० हेक्टर, तर ऊस पिकाचे ११५५० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे लक्षांक आहे. या माध्यमातून जिल्ह्णात १२ लाख २१ हजार ४४७ मेट्रीक टन उत्पादनाचा लक्षांक आहे. याकरीता महाबीजकडून ६०२५ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. तसेच कापूस पिकासाठी २३ लाख १६ हजार १४५ पाकिटांची कापूस बियाणांची मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊन कापसाचे नुकसान झाले असले तरीही कापसाच्या क्षेत्रात यंदा घट होणार नसल्याचा कृषी विभागाचा दावा आहे.कपाशीच्या बियाणांबाबत अनभिज्ञतायंदा दुप्पट बोंडअळीचा प्रादुर्भाव होईल, असा अंदाज आहे. कारण बोंडअळी नष्ट करण्यासाठी योग्य उपाययोजना झाल्या नाहीत. त्यातच आता १५ मे पासून पेरणी सुरू होत आहे. काही ठिकाणी तर १ मे पासूनच पेरणी सुरू होते. जेमतेम १५ दिवसांचा, महिनाभराचा कालावधी उरला आहे. मात्र बियाणांची परवानगी अजून दिलेली नाही. भाव ठरवून दिलेला नाही. कोणत्या बियाणांवर बंदी आहे? याची सूचनाही अद्याप दिलेली नाही. मग १५ मे पर्यंत बियाणे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचणार? असा सवाल उपस्थित होत आहे.६४३० क्विंटलचे आवंटनअन्य पिकांच्या बियाणांबाबतचे आवंटन कृषी विभागाला गुरूवार, २६ रोजी प्राप्त झाले. सुमारे ६४३० क्विंटल बियाणांचे आवंटन प्राप्त झाले आहे.३ लाख ४० हजार मे.टन खतांची मागणीजिल्ह्यात रासायनिक खतांचा वापर राज्यात सर्वाधिक आहे. मागील वर्षी खरीपासाठी ३ लाख २८ हजार ३२ मेट्रीक टन तर रब्बीसाठी १ लाख १ हजार ४८९ मेट्रीक टन असा ४ लाख २९ हजार ५२१ मेट्रीक टन खताचा वापर झाला होता. २०१८ च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ३ लाख ४० हजार मेट्रीक टन खतांची मागणी केली आहे. मात्र मंजूर आवंटन अद्याप प्राप्त झालेले नाही. मात्र जिल्ह्यात खतांचा तुटवडा नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.