शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

साध्य, साधन, साधक एकत्र आल्यास अविरत सेवा शक्य - अनिल वळसंगकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 13:07 IST

जळगावात राष्ट्रीय जनकल्याण समितीच्यावतीने पाच जणांना सेवा गौरव पुरस्कार

ठळक मुद्देकोणत्यातरी माध्यमातून सेवाकार्य करासेवा गौरव

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १४ - सगळे काम एक दिवस, १५ दिवस करणे सोपे आहे मात्र सातत्याने १ हजार दिवस तेच ्रकाम, सेवा करणे अवघड आहे. मात्र सेवालयातून भूक भागवण्याचे काम अविरत सुरू असून या सोबतच तेथे स्वाभिमानही रुजविला जात आहे. साध्य, साधन व साधक एकत्र आल्यास अविरत सेवा शक्य आहे व यातूनच इतरांनाही कार्याची प्रेरणा मिळते, असा विश्वास समुपदेशक तथा योजक संस्थेचे संचालक अनिल वळसंगकर यांनी व्यक्त केला. मात्र दुसरीकडे साधनांच्या अतिरेकामुळे संस्कारांचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही वास्तव त्यांनी या वेळी मांडले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे सुरू असलेल्या सेवालयाचा चौथा वर्धापन दिन कांताई सभागृहात साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, समितीचे जिल्हाध्यक्ष मनीष काबरा उपस्थित होते. जिल्हा कार्यवाहक विनोद कोळी यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी चित्रफितीद्वारे सेवालयाच्या कार्याची चित्रफित दाखविण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते भारतमाता पूजन करण्यात आले.कोणत्यातरी माध्यमातून सेवाकार्य करातन, मन आणि धनपूर्वक सेवाकार्य करायला हवे. तिन्ही प्रकारे एकाच वेळेला करणे जरी शक्य होत नसेल तरीदेखील कोणत्यातरी माध्यमातून सेवाकार्याशी जुळावे आणि इतरांना यात जोडावे, असे आवाहनही अनिल वळसंगकर यांनी केले.जिल्हाधिकारी यांनी मनोगतात सांगितले की, सेवा कशी करावी याचे उत्तम उदाहरण हे शेगाव गजानन महाराज देवस्थान आहे. पूर्वीची संस्कृती आणि आताची संस्कृतीमध्ये बदल झालाय. पालकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला वृद्धाश्रम उभारावे लागतात. शिकून शहाणे आपण झालो पण संस्कारांनी शहाणे झालो नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक घरात मोबाइल आहे पण पुस्तक नाही. हे पुस्तक महत्वाचे आहे.सेवा गौरवया कार्यक्रमात सेवाकार्य करणाºयांचा गौरव करण्यात आला. यामध्ये विष्णू बाणाईत, अंजली बाविस्कर, वंदना पवार, धनंजय तिवारी, डॉ. नीलिमा सेठिया यांचा पुषगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी वंदना पवार, विष्णू बाणाईत यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन अपूर्वा वाणी, सुनील याज्ञिक यांनी केले तर नंदू शुक्ल यांनी आभार मानले.

टॅग्स :Jalgaonजळगाव