शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

...तर जिल्ह्यामधील ११७९ गावात सुरू होणार शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:11 IST

= डमी - स्टार - ७५३ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त असलेली आणि भविष्यातही गाव ...

= डमी - स्टार - ७५३

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त असलेली आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावात पाचवी ते दहावी दरम्यानच्या शाळा सुरू करता येतील का? याचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात अशी १ हजार १७९ गावे आहेत, जी गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत तर ७० गावांमध्ये एकही कोरोनाचा रूग्ण आढळून आलेला नाही. परिणामी, अशा गावांमध्ये शाळा सुरू होऊ शकतात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुस-या वर्षीही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने शिक्षण दिले जात आहे. वर्षभरापासून विद्यार्थी हे घरातचं आहेत. दररोज घरात राहून ऑनलाइन शिक्षण पद्धतीला विद्यार्थी कंटाळले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे खेळण्यासह अनेक बाबींवर सुध्दा निर्बंध आलेले आहेत. शाळेत गेल्यावर आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटता येईल ही ओढ विद्यार्थ्यांना लागून आहे. त्यामुळे यंदा तरी प्रत्यक्ष शाळेला सुरूवात होईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती, पण कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या या आनंदावर विरजण पडले. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबतच्या शक्यता तपासण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत. सोबत पाचवी ते दहावीच्या दरम्यानच्या शाळा सुरू करता येतील का? असाही आढावा घेण्याचे सूचित केले आहे.

- जिल्ह्यातील एकूण शाळा - ३३९९

जिल्हा परिषद शाळा - १८२८

अनुदानित शाळा - ९६२

विनाअनुदानित शाळा - १५६

----------

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

पाचवी - ७८८२८

सहावी - ७७३११

सातवी - ७७६७७

आठवी - ७६३८५

----------

जिल्ह्यातील एकूण गावे - १४९९

सध्या कोरोनामुक्त असलेली गावे -११७९

-----------

तालुकानिहाय कोरोना मुक्त गावे

अमळनेर -१४२

भडगाव -४६

भुसावळ -५०

बोदवड -२२

चाळीसगाव - ९८

चोपडा - ९२

धरणगाव - ८६

एरंडोल - ४२

जळगाव - ७४

जामनेर - ११९

मुक्ताईनगर - ६१

पाचोरा - ९०

पारोळा -९५

रावेर - १०१

यावल -६१

१४३१ गावांमध्ये आढळले बाधित

जळगाव जिल्ह्यात एकूण १४९९ गावे आहेत. त्यापैकी १४३१ गावांमध्ये आतापर्यंत कोरोना रूग्ण आढळून आलेले आहेत. तर ७० गावांमध्ये एकही बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. आता ११७९ गावे कोरोनामुक्त झालेली आहेत. अशा गावांमध्ये शाळा सुरू करता येवू शकतात. तसेच शाळा कधी सुरू होईल, याचीही प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागून आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे मुले अभ्यासात मागे राहत असल्याने पालक देखील मुलांना शाळेत पाठविण्यास तयार आहेत.