शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांच्यासाठी’ झाडेच म्हणतात... हॅपी बर्थडे टू यु !'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 01:49 IST

दरवर्षी १ जूनला केशव रामभाऊ कोतकर यांच्या वाढदिवसाचा उत्साह त्यांच्या म. फुले कॉलनीतील घरातून ओंसाडून वाहत असतो. तीन वर्षांपूर्वी २०१६ मध्ये त्यांनी आपला ७८ वा वाढदिवस ७८ झाडे लावून साजरा केला. पुढच्या वर्षीही हा वृक्ष लागवडीचा शिरस्ता ते पाळताय. जणू प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसाला ही झाडे 'हॅपी बर्थडे टु यू !' असा गजर करतात.

ठळक मुद्देपर्यावरण दिन विशेषकेशव कोतकरांचा पर्यावरण जागरस्वखर्चाने जगवले २४० वृक्षयावर्षी लावणार ८१ झाडे

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : दरवर्षी १ जूनला केशव रामभाऊ कोतकर यांच्या वाढदिवसाचा उत्साह त्यांच्या म. फुले कॉलनीतील घरातून ओंसाडून वाहत असतो. तीन वर्षांपूर्वी २०१६ मध्ये त्यांनी आपला ७८ वा वाढदिवस ७८ झाडे लावून साजरा केला. पुढच्या वर्षीही हा वृक्ष लागवडीचा शिरस्ता ते पाळताय. जणू प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसाला ही झाडे 'हॅपी बर्थडे टु यू !' असा गजर करतात. वाढदिवसाच्या फेसबुकी, बॅनर आणि डीजे संस्कृतीला फाटा देत वयाच्या ८१ व्या वर्षी ते पर्यावरणाचा आगळावेगळा जागर करीत आहे. चाळीसगाव शहर परिसरात कोतकर परिवाराने केलेली वृक्ष लागवड 'हिरव्यागार' अभिमानाची गोष्ट ठरली आहे.आई आणि झाड यांचे प्रेम निस्वार्थ असते. त्यांची ओंजळ इतरांना देण्यासाठी भरलेली असते. अशा भरलेल्या काही ओंजळी आपणही तयार कराव्यात. अशा समर्पित भावनेने केशव कोतकर यांनी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला आहे. आजवर २४० झाडांनी म. फुले कॉलनीचा परिसर नटला असून ‘मे हीट’च्या तडाख्यात परिसराच्या डोक्यावर या झाडांनी आता सावली धरली आहे.पेढा अन् झाडाचाही गोडवाचाळीसगावचा 'नंदन' पेढा सातासमुद्रापार पोहचलाय. केशव कोतकर यांना चाळीसगाव मिल्कसिटीत 'मिल्कमॅन' म्हणूनही ओळखतात. हाती शून्य असताना त्यांनी आपल्या डेअरी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. २०१६ मध्ये त्यांनी सर्वप्रथम वयाच्या इतकी झाडे लावण्याचा संकल्प केला. त्यावर्षी ७८ झाडे लावून त्यांनी र्खया अर्थाने 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' हा संदेशही रुजवला. पेढ्यांसोबतच झाडांचाही गोडवा वाटायला सुरुवात केली. २०१७ मध्ये ७९ आणि २०१८ मध्ये ८० अशी २४० झाडे त्यांनी स्वखर्चाने जगवली आहे.झाडांना पाणी, देखरेखहीम. फुले कॉलनीत सद्य:स्थितीत बहरलेली झाडे दिसतात. कोतकर परिवरातील केशव कोतकर यांच्या पत्नी वत्सला, त्यांचा मुलगा राजेंद्र व स्नुषा व्यवसायाचा व्याप सांभाळून वृक्ष सेवा करतात. लावलेल्या झाडांना लोखंडी जाळीचे कुंपण, देखरेख, त्यांना दिवसातून दोन वेळा पाणी देणे. अशी कामे हा परिवार मोठ्या आनंदाने करतो. झाडांना पाणी देण्यासाठी गाडी तयार केली आहे.वृक्ष लागवडीचा संदेश देण्यासाठी त्यांनी घराच्या प्रवेशव्दारानजीक 'झाडे लावा, झाडे जगवा...' असा संदेश देणारे लक्षवेधक स्मृतीचिन्हही साकारले आहे.यावर्षी ८१ झाडे लावणारकेशव कोतकर यांचा वाढदिवस ८१ झाडे लावून साजरा होतोय. यावर्षी झाडे लावण्यासाठी शहिद हेमंत जोशी क्रीडांगणच्या संरक्षक भिंतीचा परिसर निश्चित करण्यात आला आहे. तापमानाचा दाह असल्याने लावलेली झाडे जगणार नाहीत, म्हणून १ जून रोजी एकच झाड लावले. पाऊस पडल्याबरोबर उर्वरीत ८० झाडे लावून त्यांना संरक्षण म्हणून लोखंडी जाळ्या लावण्यात येणार आहे, अशी माहिती राजेंद्र कोतकर यांनी दिली.झाडे लावून साजरा करा वाढदिवसहल्ली वाढदिवस साजरा करण्याची 'जोरदार' चढाओढ असते. त्याला उत्सवी स्वरुप देऊन मोठा खर्च केला जातो. हे सर्व टाळून वाढदिवसाला सामाजिक सेवेचा दीप पेटविला पाहिजे. याच भावनेतून वृक्षांसोबत मी दरवर्षी वाढदिवस साजरा करतोय. यातून मोठे समाधान मिळते.- केशव रामभाऊ कोतकरदूध डेअरी व्यवसायिक, चाळीसगाव. 

टॅग्स :environmentवातावरणChalisgaonचाळीसगाव