मुक्ताईनगर, जि.जळगाव : गुरांची बेकायदा वाहतूक केल्या प्रकरणात जप्त करून पोलीस वसाहतीच्या आवारात लावण्यात आलेल्या कंटेनरवर हात साफ करुन कंटेनरचे टायर, बॅटरी व डिझेल चोरुन नेल्याप्रकरणी मुक्ताईनगर येथील दोघांना अटक करण्यात आली आहे. १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, मुक्ताईनगर तालुक्यातून गुरांची अवैधरित्या वाहतूक करणारे कंटेनर क्रमांक (आर.जे.०९-सी.जी.२८६१) हे गुन्ह्यात जप्त केलेले आहे. हे कंटेनर मुक्ताईनगर येथील पोलीस वसाहतीच्या आवारात लावलेले होते. मुक्ताईनगर येथील प्रभात गोसावी व मुकेश सोनवणे या दोघा युवकांनी ३ ते २७ नोव्हेंबर या दरम्यान कंटेनरमधील सहा टायर (किंमत अंदाजे रक्कम ७२ हजार), दोन बॅटºया (रक्कम ५६०० रुपये) व ८० लीटर डिझेल (रक्कम १६ हजार) असा मुद्देमाल चोरुन नेला होता.याप्रकरणी हवालदार मुकेश घुगे यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोघ आरोपींना ६ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. १० डिसेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. दोघा आरोपींनी चोरुन नेलेला मुद्देमाल पोलिसांना काढून दिला आहे. तपास उपनिरीक्षक नीलेश सोळुंके करीत आहे.
मुक्ताईनगर पोलीस वसाहतीत लावलेल्या कंटेनरचे साहित्य चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:34 IST
मुक्ताईनगर , जि.जळगाव : गुरांची बेकायदा वाहतूक केल्या प्रकरणात जप्त करून पोलीस वसाहतीच्या आवारात लावण्यात आलेल्या कंटेनरवर हात साफ ...
मुक्ताईनगर पोलीस वसाहतीत लावलेल्या कंटेनरचे साहित्य चोरी
ठळक मुद्देमुक्ताईनगरातील दोघांना अटककंटेनरचे टायर, बॅटऱ्या, डिझेलची चोरी