बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील वरखेड खुर्द येथे खळ्यात बांधलेल्या पाच गायी चोरून नेल्याची घटना २१ रोजी रात्री घडली.वरखेड खुर्द येथील शेतकरी विजयसिंग नवलसिंग पाटील (वय ५०) यांचे वरखेड-कोल्हाडी रस्त्यावर खळे असून, या खळ्यात जनावरे बांधलेली असतात.दि २१ रोजी रात्री ते खळ्यातून घरी आले. त्यावेळेस खळ्यात पाच गायी बांधलेल्या होत्या. २२ रोजी पहाटे ते दूध काढण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना त्यांच्या खळ्यातील पाचही गायी दिसल्या नाही. याबाबत त्यांनी आजूबाजूलाही पाहणी केली. परंतु गायी या मिळाल्या नाही. म्हणून त्यांनी याबाबत बोदवड पोलीस ठाण्यात गायी चोरीस गेल्याची तक्रार दिली.पांढरी, लाल, भुरकट अशा रंगाच्या सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या गायी चोरीस गेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.ग्रामीण भागातून गायी पशुधन चोरीस जाण्याची ही दुसरी घटना आहे.
बोदवड तालुक्यातील वरखेड येथे पाच गायींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 18:03 IST
वरखेड खुर्द येथे खळ्यात बांधलेल्या पाच गायी चोरून नेल्या.
बोदवड तालुक्यातील वरखेड येथे पाच गायींची चोरी
ठळक मुद्देखळ्यात बांधलेल्या गायी नेल्या चोरून५० हजारांच्या होत्या या पाच गायी