शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला शस्त्राचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 12:45 IST

पहाटे तीन वाजेची घटना

ठळक मुद्देवाघडू येथे दोन घरेही फोडली बॅटरी काढून फेकून दिल्या

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जळगाव, दि. 20-  नांदगाव रोडवर हिरापूर गावाजवळील दोनच दिवसांपूर्वी सुरु झालेल्या   पेट्रोलपंपावर शनिवारी पहाटे तीन वाजता चार चोरटय़ांनी शस्त्रांचा धाक दाखवून रोकड लुटली.   पेट्रोलपंप गुरुवारी सुरु झाला. शनिवारी पहाटे तीन वाजता एका चार चाकी गाडीत चार चोरटे पेट्रोल पंपावर आले. सुरक्षारक्षकाला मारहाण करुन नंतर इतर कर्मचा-यांना चाकू आणि टॉमीचा धाक दाखविला. कॅबिन उघडून  आठ ते दहा हजाराची रोकड हिसकावून घेतली. यावेळी कर्मचा-यांनी मोबाईलवर कुणाशी संपर्क साधू नये म्हणून त्यांच्या बॅटरी काढून फेकून दिल्या. पुरावा हाती लागू नये म्हणून सीसीटीव्हीचे रेकॉर्डर घेऊन चोरटय़ांनी नांदगावच्या दिशेने धूम ठोकली. पंपाचे मालक सुनिल भावसार यांनी ग्रामीण पोलिसांना पहाटेच कळविले. त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील, पो.नि. भाऊसाहेब पटारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वाघडू येथे दोन घरेही फोडली चाळीसगाव शहरापासून पाच कि.मी. अंतरावर पूर्वेला असणा-या वाघडू येथे नव्या गावातील अवचित गबा पाटील आणि केशव गरबड पाटील यांच्या घरचा कडी - कोयंडा तोडून चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री सोन्याचे दागिने व रोकड रक्कम लांबवली. शनिवारी सकाळी चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.