शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या विद्यापीठाने तक्रार निवारण समितीचे कामकाज थांबवले!

By अमित महाबळ | Updated: October 8, 2023 18:56 IST

कार्यपद्धती ठरल्यावर काम पूर्ववत सुरू होणार

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने गेल्या महिन्यात एक ठराव करून विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीचे कामकाज थांबविले आहे. मात्र, न्यायालयीन दर्जा असलेल्या समितीचे कामकाज अशा पद्धतीने थांबविण्याचा अधिकार विद्यापीठाला नाही, असा दावा डॉ. संजय भोकरडोळे यांनी केला आहे.

या संदर्भात डॉ. भोकरडोळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करून हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. समितीचे न्यायालयीन कामकाज असल्याने ते सुरूच ठेवावे आणि याबाबत विद्यापीठाला दिशानिर्देश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. विद्यापीठाच्या कायद्यानुसार तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली असून, तिला न्यायालयीन दर्जा आहे. या समितीचे अध्यक्ष निवृत्त जिल्हा न्यायाधीश आहेत. न्यायालयाचे कामकाज थांबवण्याचा अधिकार कुलगुरू किंवा विद्यापीठाला नाही. विद्यापीठ आणि काही संस्थांच्या स्वार्थासाठी तक्रार निवारण समितीचे कामकाज थांबविण्यात आले आहे. ही अतिशय गंभीर गोष्ट असून, न्याय मिळण्याच्या हक्कापासून तक्रारदारांना दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. याप्रकरणी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी डॉ. संजय भोकरडोळे यांनी केली आहे. काम थांबविण्याचा ठराव केव्हा मंजूरतक्रार निवारण समितीचे कामकाज थांबविण्याचा ठराव दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी व्यवस्थापन परिषदेत मंजूर झालेला आहे.

कार्यपद्धती ठरल्यावर काम पूर्ववत सुरू होणारतक्रार निवारण समितीच्या कामकाजाची कार्यपद्धती निश्चित नव्हती. त्यावर आधीपासून काम सुरू होते. येत्या दोन महिन्यात कार्यपद्धती ठरल्यावर समितीचे कामकाज पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी दिली. 

ठरावावर विद्यापीठाने कार्यवाही केलीव्यवस्थापन समितीने जो ठराव केला आहे, त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने कार्यवाही केली आहे, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव