शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भाववाढ झाली दीडशेनं, तरी सोने खरेदी केली दिमाखानं; जळगाव सुवर्ण बाजारात प्रचंड उत्साह

By विलास बारी | Updated: November 10, 2023 19:47 IST

...दरम्यान, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात १५० रुपयांची वाढ झाल्याने सोने ६० हजार ८५० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले, तर चांदी ७२ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर स्थिर राहिली.

जळगाव : धनत्रयोदशीच्या एक दिवस अगोदर भावात घसरण झालेल्या सोन्याचा भाव धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर वाढला तरी खरेदीसाठी शुक्रवारी मोठा उत्साह दिसून आला. एकट्या सुवर्णनगरी जळगावात २० कोटींच्या पुढे उलाढात झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात १५० रुपयांची वाढ झाल्याने सोने ६० हजार ८५० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले, तर चांदी ७२ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर स्थिर राहिली.

साडेतीन मुहूर्तावर विविध वस्तूंच्या खरेदीसह सोने-चांदी खरेदीलाही मोठे महत्त्व दिले जाते. यासोबतच धनत्रयोदशीलादेखील सोने खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने या दिवशी एक ग्रॅम सोने तरी खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. तो उत्साह यंदाही कायम राहिला.

ऐन मुहूर्तावर भाव वधारलेगेल्या चार दिवसांपासून सोने-चांदीचे भाव कमी होत गेले. त्यामुळे खरेदी वाढणार असल्याचा अंदाज होता. मात्र, शुक्रवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात वाढ झाली. तरीदेखील खरेदीवर कोणताही परिणाम जाणवला नाही. मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धनत्रयोदशीला खरेदीचे प्रमाण अधिक वाढले असल्याचेदेखील सांगितले जात आहे. सध्या कलाकुसरीच्या दागिन्यांना अधिक पसंती असल्याने मनाजोगे दागिन्यांसाठी ग्राहकांकडून बुकिंगदेखील करून ठेवली गेली होती.

सर्वच प्रकारच्या अलंकारांना मागणीशहरात सोने खरेदी करताना सर्वच प्रकारच्या दागिन्यांना मागणी दिसून आली. धनत्रयोदशीला सोने खरेदी करायची असल्याने अनेकांनी जुन्या दागिन्यांची मोड देऊन मंगळसूत्र, अंगठी व इतर दागिने करण्यास पसंती दिली. या सोबतच अनेकांनी एक ग्रॅम सोने तरी खरेदी करून ठेवले. सुवर्णनगरी जळगावातील १७५च्या वर असलेल्या सुवर्ण पेढींमधून उलाढालीचा नक्की आकडा मिळाला नसला तरी २० कोटींच्या वर पोहोचली असावी, असे सांगण्यात येत आहे.

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शुक्रवारी मोठा प्रतिसाद मिळाला. जळगावात २० कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.- आकाश भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023GoldसोनंMarketबाजार